आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्णीमध्ये पाणीबाणी..तहसीलदारच्या कॅबिनमध्ये महिलांनी फोडल्या घागरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- आर्णी तहसीलअंतर्गत येणाऱ्या खडका येथील नागरिकानी पाण्यासाठी गुरुवारी दुपारी तहसिल कार्यालयावर घागर मोर्चा काढला. आर्णी तहसील कार्यालयावर माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्त्वात खडका येथील नागरिकांनी पाण्यासाठी मोर्चा काढला.

 

गुरुवारी दुपारी बारा वाजता घागर मोर्चा येथील तहसिल कार्यालयात धडकला. माञ कॅबिनमध्ये तहसीलदार अथवा नायब तहसीलदार हजर नसल्याने खडका येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाविरोधात तहसीलदार यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. काही महिलांनी सोबत आणलेल्या मातीच्या घागरी तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये फोडल्या. त्यामुळे बराच तहसील कार्यालयात गोंधळ उडाला होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून व्हिडिओ आणि फोटोतून पाहा... तहसील कार्यालयातील गोंधळ

बातम्या आणखी आहेत...