आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिस्थितीला कंटाळून मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंजर- आर्थिक परिस्थितीला कंटाळून एका मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीने नजिकच्या पिंपळगाव चांभारे गावात आत्महत्या केली. रामेश्वर श्रीकृष्ण राऊत, वय ३५ वर्षे असे मृतकाचे नाव आहे. त्याने गुरुवार, २६ एप्रिल रोजी सकाळी शंकर अंधारे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. 


पोलिस जमादार महादेवराव सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार रामेश्वर राऊत यांचे जन्मगाव पिंपळगाव असून, ते मध्यंतरी वनोजा गावात काही दिवसांसाठी राहण्यास गेले होते. नंतर काही दिवस मुंबई येथे कामासाठी गेले होते. गेल्या काही दिवसांपासून रामेश्वर राऊत हे पिंपळगावात आले होेते. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतीशय गंभीर होती. मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. त्याला दारूचे व्यसन जडले. मृतकाला पाच वर्षांची मुलगी असून, तीन वर्षांचा मुलगा आहे. तो नेहमी आजारी असायचा. काही कारणास्तव मृतकाची पत्नीही माहेरी गेली होती. रामेश्वर वासुदेव अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला. 

बातम्या आणखी आहेत...