आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस बीटीच्या संशयावरून महिको कंपनीला केले सिल; बुलडाणा पोलिसांची धानोरा येथे कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर- बोगस बीटी बियाण्यांच्या संशयावरून तालुक्यातील धानाेरा येथील महिको कंपनीला पोलिसांनी सील ठोकले आहे. ही धडक कारवाई शुक्रवारी डिसेंबर रोजी रात्री उशिरा बुलडाणा खामगाव पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. या कारवाईमुळे बियाणे बनविणाऱ्या कंपन्यामध्ये एकच खडबळ उडाली आहे. 


राज्यात सर्वत्र बोगस बियाण्यांच्या तक्रारी होत असून, कृषी विभाग मात्र बियाणी कंपन्यांची पाठराखण करीत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. अशी ओरड शेतकर वर्गातून होत आहे.


या बाबीला हेरत प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे धानोरा परिसरातील महिको कंपनी धडक देत कंपनीला तात्पुरते सील लावल्याची कारवाई केली. तसेच कृषी विभागाच्या वतीने या बियाण्यांचे नमूने घेण्यात येणार आहे. काल रात्रीच्या कारवाई नंतर नेहमी प्रमाणे कामगार सकाळी कंपनीत जाण्याकरिता कंपनीच्या गेटवर आले असता पोलिसांनी त्यांना आत जावू दिले नाही. कंपनीच्या गेटवरच पोलिस कर्मचारी ठाण मांडून बसले होते. या संदर्भात एसडीपीओ गिरीश बोबडे यांनी सदर कारवाई ही वरिष्ठांची असल्याबाबत सांगितले. तर प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारावर महिको कंपनीला तात्पुरते सील लावण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती खामगावचे अप्पर पोलिस अधीक्षक शाम घुगे यांनी दिली. 


यप्रकरणी संबंधित शेतकाऱ्याने तक्रार केली असता त्या तक्रारी बाबत जिल्हा कृषिअधीक्षक कार्यालयाचे गुणनियंत्रण निरीक्षक गरांडे यांनी प्रत्यक्षरित्या या शेतकऱ्याच्या शेतात जावून पंचनामा केला. दरम्यान शेतकऱ्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने गुणनियंत्रक निरीक्षक गरांडे यांच्या फिर्यादी वरुन बदनापूर पोलिस स्टेशनला महिको कंपनी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्रकरण डिसेंबर रोजी घडले. 

बातम्या आणखी आहेत...