आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूजल पातळी वाढवण्याकरिता 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' सक्तीचे करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- भूजलाचा केवळ उपसा सुरु आहे. मात्र पाणी जिरवण्याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. पाणी टंचाईच्या काळातही भूजलाचाच उपसा केला जातो. तर दुसरीकडे शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले असताना याबाबत जनजागृती केली जात नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला पाणी मिळण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करून त्याबाबत जनजागृती राबवावी, अशी मागणी शिवसेनेचे पूर्व महानगर प्रमुख अतुल पवनीकर यांनी आयुक्त जितेंद्र वाघ यांना एका निवेदनातून केली. 


शासनाने शासकीय कार्यालयांना रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. तर बांधकामाचा नकाशा मंजूर करतानाही रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक आहे. मात्र हे बंधन केवळ कागदावरच राहिले आहे. नव्याने बांधलेल्या मालमत्तांवर रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना केली आहे की नाही? याची तपासणी केली जात नाही. तर दुसरीकडे शासकीय इमारती, महापालिका कार्यालय, महापालिका शाळा, झोन कार्यालये, व्यापारी संकुल, मंगल कार्यालये, हॉटेल्स, बसस्थानक, शाळा, महाविद्यालये आदींवरही ही योजना राबवलेली दिसत नाही. दिवसेंदिवस पाण्याचा उपसा वाढत असल्यामुळे भूजलाची पातळी खालावत चालली आहे. जर रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सक्तीची न केल्यास पुढच्या पिढीला पाणीच मिळणार नाही. ही अतिशय गंभीर बाब लक्षात घेवून महानगराची हद्द वाढ लक्षात घेता या सर्व ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करावे तसेच बांधकाम केल्या नंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवल्या नंतरच भोगवटा प्रमाण पत्र संबंधित बांधकाम धारकाला द्यावे तसेच आपल्या स्तरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग मोहीम राबवावी, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. 


या निवेदनावर शिवसेना महानगर पूर्व प्रमुख अतुल पवनीकर, केदार खरे, पप्पू चौधरी, गजानन बोराळे, शशिकांत चोपडे, राजु वगारे, अविनाश मोरे, विलास मुंडोकार,भूषण मुंडोकार, भूषण हागे, उमेश श्रीवास्तव, निलिमा तिजारे, देवश्री ठाकरे, सुनिता श्रीवास, कमला सांगळूदकर, शरद तुरकर, रुपेश फाटे, राजु पावडे, मुकेश निमजे, अस्तिक चव्हाण, दिलीप विश्वकर्मा, सौरभ नागोरी, प्रणव घोंगे, राजु कानपुरे, नागेश देशमुख, नितीन तायडे, ऋषिकेश खंडेसोड, विशाल शिंदे, विष्णू पद्मने आदी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...