आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न औषध प्रशासन विभागाने भाजी बाजारातून घेतले आंब्याचे नमुने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अन्न औषध प्रशासन विभागाने सोमवारी जनता भाजी बाजारात आंबा विक्रेत्यांची झाडाझडती घेतली या वेळी दोन दुकानातून आंब्याचे नमुने घेतले. रासायनिक पदार्थांचा सर्रास वापर करून आंबे पिकवल्या जात असल्याचे वृत्त 'दिव्य मराठी'ने प्रकाशित केले होते हे विशेष. 


या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी १८ मे रोजी भाजी बाजार अकोला येथे अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार समवेत गोरे यदुराज दहातोंडे व ताथोड यांनी घाऊक आंबे विक्रेत्यांच्या तपासण्या करून ताज फ्रूट सेंटर व आयएस फ्रूट सेंटर या दुकानातून आंब्याचे नमुने घेतले. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. हे आंबे पिकवताना कार्बाइड पावडरचा वापर करु नये, असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे . 


शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक आहे. बहुतांश विक्रेते रासायनिक प्रक्रिया करून व कार्बाइड पावडरचा वापर करून कच्चे आंबे पिकवत आहेत. असे आंबे खाल्ल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...