आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थीनीच्या शरिराला वाईट भावनेने स्पर्श; अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकास अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाव- शाळेत सुरू असलेल्या कवायतीच्या निमित्ताने शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या एका लहान विद्यार्थीनीच्या शरिराला वाईट भावनेने स्पर्श करून अश्लील चाळे केल्याची निंदनीय तेव्हढीच संतापजनक घटना गुंज येथील मनोहरराव नाईक माध्यामिक कनिष्ठ विद्यालयात घडली. शिक्षकाच्या या अभद्र वर्तणुकीची तक्रार पिडीत विद्यार्थीनीने पालकाकडे केली. त्यानंतर गुंज येथील पालक वर्गामध्ये प्रचंड संताप उफाळला असुन तिनशे पेक्षा अधिक संतप्त पालकांचा जमाव गुरूवारी दुपारी विद्यालयावर धडकला. यावेळी सुट्टीचा बहाना करून तो शिक्षक शाळेतुन बेपत्ता झाला. ही बाब लक्षात येताच पालकांनी आपला मोर्चा महागाव पोलीस ठाण्याकडे वळविला. नामदेव आडे असे त्या शिक्षकाचे नाव असुन त्याच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. 


गुंज येथे मनोहरराव नाईक माध्यामिक कनिष्ठ महाविद्यालयात नामदेव आडे हा साहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ईयत्ता ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तो शिकवितो. शाळेत शारिरीक शिक्षणाच्या तासीके दरम्यान कवायतीच्या बाहन्याने हा शिक्षक शाळेतील विद्यार्थींनीच्या शरिराला वाईट भावनेने स्पर्श करीत असल्याची तक्रार आहे.बुधवारी कवायतीच्या तासीकेत नामदेव आडे याने एका विद्यार्थीनी सोबत अश्लील चाळे केले. पिडीत विद्यार्थ्यांनीने घरी परतल्यानंतर पालकांच्या कानावर हा प्रकार टाकला. हा नराधम शिक्षक विद्यार्थीनीशी अभद्र चाळे करीत असल्याचे समजल्यावरून संतप्त पालकांनी बुधवारी रात्रीच एकत्रीत येऊन या संदर्भात विचार विनीमय केला. 


यावेळी तिन ते चार विद्यार्थींनी आपल्या सोबतही असेच कृत्य सदर शिक्षकाने केल्याची बाब पालकांना सागीतली. त्यामुळे गुरूवारी त्या शिक्षकाला जाब विचारण्यासाठी संतप्त पालकांचा जमाव विद्यायात धडकला. परंतु त्यापुर्वीच नामदेव आडे याने सुट्टीचा बहाना करून पोबारा केला. शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी घेऊन पालकांनी महागाव पोलीस ठाणे गाठले. विद्यार्थीनीशी अभद्र चाळे केल्याच्या घटणेने पालक प्रचंड भडकले असुन जनभावनेची दखल घेत पोलीसांनी सायंकाळी त्या शिक्षकास पुसद येथुनी ताब्यात घेतले आहे. 


आरोपी शिक्षक संस्था चालकांचा नातेवाईक 
मुलींशी अभद्र चाळे करणारा नामदेव आडे हा संस्था चालकांचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती मीळाली आहे .काही दिवसापुर्वी याच विद्यालयातील मुख्याध्यापकाने शाळेतीलच सेविकेचा विनयभंग केल्याची घटणाही घडली होती. हा मुख्याध्यापक ही संस्थाचालकांचा नातेवाईक असल्याचे कळते.

 
अनेक विद्यार्थीनीशी अभद्र चाळे 
नामदेव आडे या शिक्षकाने बुधवारी एका विद्यार्थीनीशी अभद्र चाळे केल्याची घटणा उजेडात आली. हा प्रकार पुढे येताच या शाळेतील अजुन दोन विद्यार्थ्यांनीनी आपल्या सोबतही असाच प्रकार केल्याची आपबिती रडतरडत कथन केली. त्यामुळे हा प्रकार आनखी अणेक विद्यार्थीनींसोबत घडला असल्याची शक्यताही आता वर्तविण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...