आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचे मायबाप गरीब हाये, पदवीपर्यंत मोफत शिक्षण द्या;जिल्हािधकारी कार्यालयासमोर निदर्शने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आमचे मायबाप गरीब आहेत, ते खर्च करू शकत नसल्याने आम्हाला पदवीपर्यंतचे िशक्षण मोफत दिले जावे, या मागणीसाठी अंगणवाडी-बालवाडीसह शालेय विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हािधकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.  


ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्या (एआयएसएफ) नेतृत्वात सोमवारी राज्यव्यापी  ‘िशक्षण वाचवा’ आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्या हाकेला प्रतिसाद म्हणून दुपारी हे आंदोलन केले गेले. आंदोलनाच्या शेवटी िजल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. एआयएसएफचे पदाधिकारी नयन गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. राज्य शासनाने अलीकडेच १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. िशवाय िशक्षण ही सरकारची जबाबदारी राहू नये म्हणून बहुतेक शाळांचे व्यवस्थापन कंपन्यांकडे सोपवण्याचे कारस्थानही सुरू आहे. आजच्या आंदोलनामार्फत या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधले गेले. िशवाय हे दोन्ही निर्णय मागे घेतले जावे, अशी मागणी रेटली गेली. अंगणवाडी िशक्षिकांच्या िरक्त जागा व शाळांमधिल िशक्षकांची भरती, िशक्षणाच्या बाजारीकरण व कंपनीकरणाच्या िनर्णयाला स्थगिती, बेरोजगारी आणि महागाईला लगाम, नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता आणि मुंबई येथील छात्रभारतीच्या िवद्यार्थ्यांवर सुरू असलेली कारवाई रद्द केली जावी आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या. आंदोलनात रमेश गायकवाड, सुरेखा ठोसर, बबन कानकीरड, रामदास ठाकरे, ज्योती धस, विनोद साकला, आदी कार्यकर्ते-विद्यार्थी सहभागी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...