आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारदार हत्याराने पत्नीचा गळा कापून निर्घृण खून; शिक्षकाला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा- उगला येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने आपल्या शिक्षिका असलेल्या पत्नीचा धारदार हत्याराने गळा कापून निर्घृणपणे खून केल्याची घटना १० डिसेंबर, रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. आरोपी शिक्षकास पोलिसांनी आज ११ डिसेंबर रोजी अटक केली आहे. सिंदखेडराजा येथील रहिवासी प्रफुल्ल बाबुराव सरोदे वय ४५ वर्षे हा उगला येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर त्याची पत्नी सुलभा प्रफुल्ल सरोदे वय ४० वर्षे ही शहरातील नगर परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. त्यांना दोन मुले असून प्रफुल्ल सरोदे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामुळे पती- पत्नीमध्ये नेहमी वाद होत. त्यातून हे प्रकरण न्यायालयात गेले. 

 

त्यामुळे सुलभा सरोदे या त्यांच्या भावाच्या घरी, वीज वितरण कंपनीत वायरमन असलेल्या धनंजय दाभाडे यांच्याकडे राहत होत्या. सुटी असल्याने आजोबांकडे राहणारी दोन्ही मुले रविवारी आईला भेटण्यासाठी मामाच्या घरी आलेली होती. दरम्यान रात्री आठ वाजेच्या सुमारास शिक्षक पती प्रफुल्ल सरोदे हा तेथे आला. यावेळी पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यावेळी सुलभा सरोदे यांच्या भावजयीने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रफुल्लने धारदार हत्याराने सुलभाच्या मानेवर वार केला. त्यामुळे सुलभाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारामुळे दोन्ही मुले घाबरून घरातून पळून गेली. अन्यथा त्यांच्याही जीवाचे काही बरेवाईट झाले असते. 


घटनेनंतर आरोपी प्रफुल्ल सरोदे हा सुद्धा तेथून फरार झाला. त्याला आज ११ डिसेंबर रोजी दुपारी ठाणेदार बळीराम गीते सहकारी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार, शिवाजी शिंगणवाड, जमादार रमेश गोरे, राजू घोलप, रामदास वैराळ, काकड, महिला पोलीस वैशाली कोरडे करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...