आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक मान्यतेपूर्वीच केला खर्च; नियमबाह्य दिली ठेकेदारास देयके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- पातूर-नंदापूर येथे १४ व्या वित्त अायाेगाअंतर्गत करण्यात अालेल्या कामांमध्ये वित्तीय अनियितता झाल्याचा ठपका पंचायत समितीने केलेल्या चाैकशी अहवालात ठेवण्यात अाला आहे. हा अहवाल गट विकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला असून, तांत्रिक मान्यतेपूर्वीच खर्च करण्यात अाला असून काेणत्याही दस्तावेजाचा अाधार न घेताच पुरवठादारास अग्रीम म्हणून १ लाख ३४ हजार ८५० रुपये नियमबाह्यपणे अदा केल्याचेही अहवालात नमूद केले अाहे. साहित्य खरेदी प्रक्रियेत विहित पद्धतीचा अवलंन न करणे, मंजूर कामाचे झालेल्या मू्ल्यांकनापेक्षा जादा खर्च करण्यात अाला अाहे. या अनियमिततेस सरपंच व सचिव समप्रमाणात जबाबदार अाहेत, असेही चाैकशी अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात अाले अाहे. कामांचे दस्तावेजचही ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नसल्याचेही चाैकशी दरम्यान अाढळून अाले. 

पातूर-नंदापूर येथील नीलेश अव्हाळे यांनी जि.प.कडे तक्रार दिली हाेती. या तक्रारीनुसार १४ वित्त अायाेगाच्या प्राप्त निधीतून एकाच कामांवर संबंधित तीन वेगवेगळ्या फंडातून खर्च करण्यात अाले हाेते. तक्रारीनुसार पंचायत समितीचे शाखा अभियंता प्रसन्ना राठाेड, सहाय्यक 

अशी आढळली अनियमितता 
- विहिरीतील गाळ काढणे, खाेलीकरण, खाेदकामावर २ लाख ३४ हजार ८५० रुपयांचा खर्च झाला. तांत्रिक मान्यता प्रदान करण्यापूर्वीच काम झाल्याचे दाखवून मंजुरीचा खर्च ४० हजार रुपये दाखवण्यात अाला. हा संपूर्ण खर्च नियमबाह्य ठरताे, असे अहवालात नमूद करण्यात अाले अाहे. 
- महाराष्ट्र ग्राम पंचायत लेखा संहिताअन्वये साहित्य खरेदी करताना निविदा प्रक्रिया राबवून साठ्याची नाेंद करणे अावश्यक हाेते. मात्र या पद्धतीचा अवलंब करण्यात अाला नाही,तसेच एकाच पुरवठादाराकडून साहित्य खरेदी करण्यात अाले. 

ग्रा.पं.कार्यालयात दस्तावेजच नाहीत 
२ लाख २०० रुपयांचे ७७ एलईडी पथदिवे खरेदी करण्यात अाले. मात्र लेखा संहिताअन्वये राबवण्यात अालेली खरेदी प्रक्रिया, पुरवठा अादेश, पथदिवे तांत्रिक दृष्टया याेग्य याबाबतचे प्रमाणपत्र, देखभाल-दुरुस्तीचे हमी पत्र, निविदा प्रक्रिया याबबातचे काेणतेही दस्तावेजच ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नव्हते. यावरून सावळा गोंधळ लक्षात येतो,असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

मूल्याकनापेक्षा जादा खर्च 
विहिरीतील गाळ काढणे, बाेअर करणे या कामावर तांत्रिक अधिकाऱ्यांनी २ लाख ३ हजार ८२८ रुपये खर्च झाल्याचे मूल्याकंन केले. मात्र खर्चाच्या नाेंद रजिस्टरमध्ये या कामावर २ लाख ३४ हजार ८५० रुपये खर्च झाल्याने नमूद करण्यात अाले. त्यामुळे ३१ हजार २२ रुपये जादा खर्च केल्याचे दिसून येत. तसेच हातपंप साहित्य खरेदीवर ४८ हजार ८०० रुपयांचा खर्च करण्यात अाला. मात्र एकूण एकूण ७९ हजार ८२२ रुपयांच्या खर्चाचे अभिलेखे ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नसल्याचे सचिवांनी लेखीस्वरुपात दिले.तत्कालीन सचिव व सरपंचांनी कर्तव्यात कसूर-हलगर्जीपणा केला, असा ठपका चाैकशी अहवालात ठेवण्यात अाला अाहे. 

निविदा न बाेलावताच केली साहित्य खरेदी 
घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत २ लाख ५० हजार रुपयांच्या कचराकुंड्या खरेदी करण्यात अाल्या. लेखा संहिता नियमान्वये विहित पद्धतीचा अवलंब करुन कमीत कमी दराने साहित्य खरेदी करणे अावश्यक हाेते. मात्र ग्राम पंचायतीने निविदा न बाेलविता एका विशिष्ट पुरवठा धारकाकडूनच योजनेसाठी आवश्यक साहित्य खरेदी केले असून, ही बाब नियमबाह्य व वित्तीय अनियमितता ठरते, असे अहवालात नमूद करण्यात अाले अाहे.