आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुराव्याअभावी पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पतीची निर्दोष सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पतीने पत्नीच्या अंगावर घासलेट टाकून जाळले. त्यात पत्नीचा मृत्यू झाला. असा आरोप पती व सासू सासऱ्यांवर होता. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. 

 

नेर येथील रामधन तायडे यांची मुलगी अलका हिचे लग्न बोरगाव वैराळे येथील शुद्धोधन गोवर्धन डोंगरे याच्यासोबत फेब्रुवारी २०१५ मध्ये झाले होते. आरोपी व त्याचे वडील गोवर्धन व आई पंचफुला यांच्यावर आरोप होता की, ६ सप्टेंबर २०१५ रोजी अलकाच्या हातून गडवा पडला म्हणून पती शुद्धोधन याने पत्नीसोबत भांडण केले. त्यानंतर सासरे व सासू यांनी पत्नी अलका हिला पकडून ठेवले व पती शुद्धोधन याने तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. उपचारादरम्यान अलकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध सुरुवातीला भांदवि ३०७ व नंतर ३०२,३०४ ब आणि ४९८ अ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तिघांनाही पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. परंतु परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांचे बयाण यामध्ये तफावत असल्याने न्यायालयाने आरोपींची निर्दोष सुटका केली. आरोपी पक्षातर्फे अॅड. दिलदार खान व अॅड. फौजिया शेख यांनी काम पाहिले. 


पती, सासू-सासरे यांनी जाळल्याचा जबाब 

मृतक अलका हिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिने मृत्यू पूर्व बयाण दिले होते. त्यात तिने सासू-सासरे यांनी पकडून ठेवले तर पतीने घासलेट टाकून पेटून दिल्याचे म्हटले होते. त्यानंतर तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक साठवणे यांना सुद्धा असेच बयाण दिले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...