आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील विविध मंदिरांमध्ये डस्टबिनचे वितरण; देवाच्या साक्षीने स्वच्छता अभियानासाठी उचलण्यात आले पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - भक्तांची अगाध श्रद्धा असलेल्या देवाच्या मंदिरात स्वच्छता असावी, निर्माल्य पायदळी न यावे यासाठी अकाेला जिल्हा सर्व खाद्य पेय विक्रेता असोसिएशनने भगवंतांच्या साक्षीनेच स्वच्छतेसाठी पुढाकार घेत मंदिरांमध्ये डस्टबिन वितरणाला प्रारंभ केला अाहे. तूर्तास महानगरातील प्रमुख मंदिरांमध्ये डस्टबिनची व्यवस्था करण्यात अाली असून, या सर्व मंदिरांमध्ये   डस्टबीनचा वापर हाेत अाहे. दुसऱ्या दिवशी कचरा मनपाच्या घंटा गाडीत टाकण्यात येताे. 

 

काही मंदिरांमध्ये भक्तांची वर्दळ प्रचंड असते. अनेक कारणांमुळे सातत्याने स्वच्छता करणे शक्य हाेत नाही. मंदिरांमध्ये येणारे भाविक हार, प्रसाद , धार्मिक विधीसाठींचे साहित्य घेऊन येतात. पूजा, दर्शन, विधी अाटाेपल्यानंतर कागद, वेष्टन, दुधाची रिकामी पाकिटं, अगरबत्ती व इतर साहित्याचे रिकामे पुडे कुठे फेकावेत, असा प्रश्न भक्तांना पडताे. तसेच राेज तयार हाेत असलेल्या निर्माल्य साठवणुकीचाही प्रश्न असायचा. याच बाबी हेरून अकोला जिल्हा सर्व खाद्य-पेय विक्रेता असोसिएशनचे उपाध्यक्ष ओमप्रकाश गोयनका यांनी एका बैठकीत मंदिरांना उत्तम दर्जाच्या माेठ्या डस्टबिन वितरण करण्याची संकल्पना मांडली. ही संकल्पना अध्यक्ष याेगेश अग्रवाल यांनी उचलून धरत इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि चांगल्या दर्जाच्या डस्टबीनचे िवतरणालाही प्रारंभ झाला. या कार्यात उपाध्यक्ष कृष्ण कुमार राठी, , सचिव दीपक वोरा, दिनेश मेहता, भावेश खिलोसिया, शिवकुमार खत्री, शैलेश खत्री, संजय शिसोदिया, गुड्डू ठाकूर, अमित केजरीवाल, नरेंद्र अग्रवाल, भूषण मेहता, आशिष अग्रवाल, सनी ओबेराय, केतन शहा यांनी सहकार्य केले. या कार्यात शिवसेनेच्या पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा यांचेही सहकार्य लाभले अाहे. 


या मंदिरांमध्ये झाले वितरण 
सर्व खाद्य पेय विक्रेता असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रथम या उपक्रमाला प्रतिसाद कसा मिळताे, डस्टबिनचा नियमित वापर हाेताे कि नाही, हे पाहण्याचा विचार केला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सर्वाधिक वर्दळ असलेल्या काही प्रमुख मंदिरांमध्ये डस्टबीन ठेवण्यात अाले. यात श्री राज राजेश्वर महाराज मंदिर, काळा माराेती मंदिर, राणी सती मंदिर, रिझर्व माता मंदिर, मोठे राम मंदिर, छोटे राम मंदिर, गणपती मंदिर, हरिहर मंदिर, झुलेलाल मंदिर, तुळजा माता मंदिर, शनि मंदिर, गणेश मंदिर ( गायगाव), तपे हनुमान मंदिर (मोहता मिल), श्रीनाथजी मंदिराचा समावेश हाेता. 


असा राहील दुसरा टप्पा 
डस्टबिन वितरणासाठी सर्व खाद्य पेय विक्रेता असोसिएशनने टप्पे निश्चित केले अाहेत. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक वर्दळ असलेल्या मंदिरांमध्ये डस्टबिन ठेवण्यात अाले. अाता दुसऱ्या टप्प्यात अाणखी काही मंदिरांना डस्टबिन उपलब्ध करुन देण्यात येणार अाहे. यात ज्योतिर्लिंग मंदिर, विठ्ठल मंदिर, जैन मंदिर, गजानन महाराज मंदिर, हिंगणा हनुमान मंदिराचा समावेश अाहे. 

बातम्या आणखी आहेत...