आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवंग लोकप्रियतेचा विकासात अडथळा नको; महापाैर विजय अग्रवाल यांचा शिवसेनेला टाेला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सवंग लाेकप्रियेसाठी काेणीच विकासकामात अडथळा निर्माण करु नये, असा टाेला महापाैर विजय अग्रवाल यांनी कॅनाॅल जागेच्या हस्तांतरण प्रक्रियेवरुन शिवसेना नेत्यांचे नाव न घेता गुरुवारी पत्रकारांशी बाेलताना लगावला. याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक हाेणार अाहे, येथे उल्लेखीय. 


जुने शहरातील बाळापूर रोड ते डाबकी रोड दरम्यान मोर्णा कालव्याचा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होणार अाहे. रस्ता विकासासाठी हस्तांतरीत करण्यासाठी मौजे सुकापूर निजामपूर, मौजे अकोला, मौजे तपलाबादमधून एकूण १३ शेत सर्व्हेमधून मोर्णा कॅनाॅल सर्व्हिस रस्ता जात अाहे. यासंबधी ७ लक्ष ८४ हजार रुपयांचा भरणा केला असून, या भागाची मोजणी मार्चमध्ये होणार आहे. मात्र अनेक जण विनाकारण पत्रव्यवहार करीत असल्याचा अाराेप महापाैरांनी केला. 


अर्धवट माहितीच्या अाधारे बाेलू नये

थकित मालमत्ता करांवर लावलेली शास्ती कर माफ करण्याची मागणी करणाऱ्यांनी अर्धवट माहितीच्या अाधारे बाेलू नये, असा टाेला अग्रवाल यांनी मदन भरगड यांना लगावला. 

बातम्या आणखी आहेत...