आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिव हाजीर हाे...,उद्या देणार संक्षिप्त माहिती; त्यानंतर साक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - जून २०१७मध्ये जिल्हा परिषदेच्या दाैऱ्यात पंचायत राज समितीला (पीअारसी) अाढळून अालेले विविध विभाग-योजनांमधील घाेळ, अनियमितता यावर २९ आणि ३० मे राेजी राेजी मंत्रालयात संबंधित सचिवांची साक्ष नोंदवण्यात येणार अाहे. तत्पूर्वी सोमवार, २८ मे राेजी ग्राम विकास विभागाच्या सचिवांना प्रशासनाकडून संक्षिप्त माहिती सादर करण्यात येणार   अाहे. यासाठी चौथ्या शनिवारी सुटीच्या दिवशीही जिल्हा परिषदेत विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी माहितीची अंतिम पडताळणी व दस्तावेज संकलनाचे काम करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पीअारसीसमाेर शालेय पाेषण अाहार, रस्ता, काेल्हापुरी बंधारे बांधकाम, जनावरे वाटप योजनेअंतर्गत घाेळाची उलट तपासणी हाेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. साक्षनंतर संभाव्य कारवाईच्या भीतीने संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली अाहे. 
पंचायत राज समितीने १ ते ३ जून २०१७ या दरम्यान दाैरा केला हाेता. दाैऱ्यात पहिल्या दिवशी विविध याेजना, कामांमध्ये झालेली अनियमितता व खर्चावर चर्चा झाली हाेती. पीअारसीने सन २००८ व २००९ आणि सन २०११-१२मध्ये लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालावर संबंधित अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली हाेती. संपूर्ण दाैऱ्यात अनेक अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणांमध्ये स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला हाेता. 


माहिती संकलन जवळपास पूर्ण : काही दिवसांपूर्वी साक्ष नोंदवण्याच्या प्रक्रियेचा कार्यक्रम निश्चित करण्यात अाला. त्यानुसार प्रथम एप्रिल महिन्यात इतिवृत्तानुसार िजल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी माहिती संबंधित खात्याच्या सचिवांना सादर केली. मात्र त्यात अाणखी काही अतिरिक्त माहिती सादर करण्याचे अादेश देण्यात अाले. काही मुद्यांबाबत त्रुटीही काढण्यात अाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. त्यानंतर मे महिन्यात साक्ष नाेंदवण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात अाला. त्यानुसार २६ मे राेजी राेजी चौथा शनिवार असल्यानंतरही सुटीच्या दिवशी जि.प.मध्ये काही विभागांमध्ये माहिती संकलनाचे काम सुरु हाेते. माहिती संकलनाचे काम जवळपास पूर्ण झाले अाहे. 


यावर हाेणार साक्ष ? : पीअारसीच्या दाैऱ्यात अनेक घाेळ समाेर अाले हाेते. त्यामुळे साक्षी प्रक्रियेत पुढील मुद्यांसह इतरही बाबींवर उहापाेह हाेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे 
पीअारसीने दापुरा, मनब्दा, भांबेरी येथे भेटी देऊन काही लाभार्थींची चर्चा केली हाेती. लाभार्थींनी जनावरे मिळाली नसल्याचे सांगितले हाेते. गुरांना बांधण्यासाठी असलेले गाेठेही दिसून अाले नाहीत. मात्र पशुधन विकास विभागाच्या लेखी दापुरा येथे अाठ, मनब्दा येथे दाेन, भांबेरी येथे सहा व थार येथे एका लाभार्थ्याला म्हैस देण्यात अाल्याची नाेंद हाेती. विशेष घटक योजनेअंतर्गत सन २०१५-१६मध्ये २६९ तर सन २०१६-१७मध्ये २८० म्हशींचे वितरण करण्यात अाले हाेते. पीअारसीच्या दाैऱ्यात बाळापूर तालुक्यातील शालेय पाेषण अाहाराचा मुद्दा गाजला हाेता. पाेषण अाहार खरेदीतील घोळप्रकरणी संबंधितांची साक्ष नोंदवण्यात येणार अाहे. 
मुलींना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी १६ लाखांपेक्षा जास्त खर्च करण्यात अाला. मात्र यामध्ये अनियमितता झाली. नियमांना डावलून एका कंपनीला काम देण्यात अाले हाेते. या उपक्रमावर वित्त विभागानेही अाक्षेप नाेंदवला हाेता. 


काेल्हापुरी बंधाऱ्यांमधील विशेष दुरुस्तीतील जुन्या ऐवजी नवीन लाेखंडी निडल्स टाकणे व नवीन बंधाऱ्यांच्या कामांसाठीच्या पुरवठ्यातील मूल्यांकन नियबाह्यपणे रक्कम प्रदान करणे, हातपंप संच खरेदी, अाैषध पुरवठा,विशेष घटक योजनेअंतर्गत मर्यादेपेक्षा जादा दराने अनुदान देणे, दलित वस्ती दुरुस्ती व बांधकामाबाबत साक्ष नोंदवण्यात येणार अाहे. दुधाळा, मंडळा रस्ता बांधकामातील अनियमिततेवर चर्चा हाेणार अाहे. 


पीअारसीने शेळद येथील बंधाऱ्याची पाहणी केली हाेती. बंधाऱ्यांला प्रथम २० लाख रुपये खर्च अाला. त्यानंतर ५८ लाख रुपये मंजूर करण्यात अाले. मात्र हा संपूर्ण निधी पाण्यात गेला. त्यामुळे यावर पीअारसीने नाराजी व्यक्त केली हाेती.


सीईअाेंनी घेतली बैठक 
पीअारसीच्या साक्षीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी शनिवारी गट विकास अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख यांची बैठक घेतली. बैठकीत साक्षीच्या अनुषंगाने मंत्रालयात नेण्यात येणाऱ्या दस्तावेजांबाबत चर्चा झाल्याचे समजते. २६ मे राेजी सामान्य प्रशासन विभाग, पंचायत, लघुसिंचनसह इतरही विभागांमध्ये याच बाबत कामकाज सुरु हाेते. 

बातम्या आणखी आहेत...