आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अकोला - भाजपचा नेता प्रकाश रुद्रस्वामी रेड्डी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. तेथे त्याने काही बनावट दस्तावेज सादर केले. त्याआधारे त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला. मात्र त्याची बनवेगिरी जास्त वेळ लपून राहू शकली नाही. अखेर त्याच्या बनवेगिरीचे बिंग फुटले. जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्याच्या वकिलांनेच खुद्द पक्षकाराचाच जामीन रद्द करण्यासाठी स्वत: न्यायालयात अर्ज केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द केला. आरोपीने न्यायालयाची केलेली दिशाभूल ही न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडवणारी होती, असे आदेशात म्हटले आहे.
प्रकाश रेड्डी याची पत्नी जिल्हा परिषद सदस्या आहे. प्रकाश रेड्डी याने ३२ वर्षीय युवतीवर बलात्कार केला व तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. युवतीच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी त्याच्याविरुद्ध २२ फेब्रुवारी रोजी कलम ३७६, ४५२, ३२३, ५०६ नुसार गुन्हे दाखल केले. तेव्हापासून आरोपी प्रकाश रेड्डी हा फरार आहे. दरम्यानच्या काळात त्याने अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र यावेळी त्याने बनावट कागदपत्राचा आधार घेतला. कोर्टचे आदेशासारखे दुसरे बनावट दस्तावेज आरोपीने त्याच्या वकिलांना दिले. वकिलांनी त्याचा आधार घेत युक्तीवाद केला. त्याआधारे आरोपी प्रकाश रेड्डीला ५ एप्रिल रोजी जामीन मिळाला होता. मात्र त्यानंतर युवतीने न्यायालयात धाव घेत सरकारी वकिलांची भेट घेतली आणि आरोपीचा युक्तीवाद निराधार असून त्याने न्यायालयात दाखल केलेले दस्तावेज खोटे असल्याचे सांगितले. त्यानंतर सत्यप्रत आरोपी उपलब्ध करू न शकल्याने त्याचे वकिलाचीच एकप्रकारे दिशाभूल केल्याचे समोर आले. आपल्या अशीलाने आपली दिशाभूल केल्याचे आरोपी रेड्डीच्या वकिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी पुन्हा न्यायालयात आरोपीला दिलेला जामीन रद्द करण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन नाकारला आहे. आरोपीच्या वतीने ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. ए.एस. मनोहर यांनी तर सरकारपक्षाच्या वतीने अॅड. एच.डी. दुबे यांनी बाजू मांडली.
सात दिवसात हजर होण्याचे आदेश
आरोपीला नागपूर खंडपीठाने जामीन नाकारला आहे. त्याने बनावट कागदपत्राचा आधार घेतल्याची माहीती आहे. सात दिवसाच्या आत आरोपीला न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. संतोष महल्ले, ठाणेदार खदान पोलिस ठाणे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.