आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० काेटी रुपयांचे चुकारे थकले; खरीपासाठी पैसा काेठून अाणावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- शासनाच्या तूर खरेदी प्रक्रियेला शासकीय यंत्रणांचा बेताल कारभार व त्यांचे खासगी यंत्रणेशी असलेले साटेलोटे यामुळे खीळ बसल्यानंतर अाता लालफीत शाहीच्या कारभारामुळे तूर खरेदी झाल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ५० काेटी ९२ लाख ३१ हजार ६६७ रुपयांचे चुकारे थकल्याची बाब पुढे अाली अाहे. महाराष्ट्र स्टेट काॅ-अाॅप. मार्केटिंग फेडरेशननेकडे नाेंदणी झालेल्या ३१ हजार ७१६ पैकी ८ हजार ९१३ शेतकऱ्यांना ७१ काेटी ३६ लाख ३ हजार ८१६ रुपये अदा केले अाहेत. विदर्भ काॅ-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनने अातापर्यंत २६ काेटी ३१ लाख रुपये अदा केले असून, १६ काेटी ७६ लाख १२ हजार ८४२ रुपये देणे बाकी अाहे. पैसेच मिळत नसल्याने खरीप हंगामातील पिके कशी घ्यावीत, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत अाहे. 


जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट काॅ-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे अकाेला, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी, वाडेगाव, पारस तर विदर्भ काॅ-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनने अकाेला व मूर्तिजापूर येथे खरेदी प्रक्रिया राबवली. मात्र जिल्ह्यातील गाेदामं इतर जिल्हयातील धान्यांची भरण्यासाठी अकाेल्यातील खरेदी प्रक्रिया संथ गतीने राबवण्यात अाल्याची बाब १४ मे राेजी भाजप खासदार-अामदारांनी अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत उजेडात अाली हाेती. तूर खरेदीची मुदत संपुष्टात अाली असून, सध्या ३३ हजार ९९५ शेतकऱ्यांची तूर मोजणीविना पडून असून, माेजणी झालेले शेतकरी चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत अाहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिके कशी घ्यावीत, कर्जासाठी काेणत्या यंत्रणेकडे जावे, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले अाहेत. 


शेतकरी जागर मंचचे अाज धरणे

यंदा केवळ ५५ टक्केच दिवस तूर खरेदी सुरु हाेती.यातून सरकारी यंत्रणांची उदासीनता दिसून येत असून, याबाबत शेतकरी जागर मंचतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे अांदाेलन करणार अाहे. याबाबत मंचने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले हाेते. जिल्ह्यात एकूण ४५९५५ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी अाॅनलाईन नाेंदणी केली हाेती. एकूण ३३ हजार ९९५ शेतकऱ्यांची तूर माेजणी िवना पडून अाहे. यात अकाेला-८३५०, तेल्हारा-२१२८, पातूर-३०२८, बार्शीटाकळी-४०१८, वाडेगाव-४३७५, पारस-२८५९, अकाेट-५३३६ आणि मूर्तिजापूर केंद्राअंतर्गत ३७०१ शेतकऱ्यांचा समावेश अाहे. 


असे अाहेत पैसे अदा व थकल्याचे चित्र 
१) महाराष्ट्र स्टेट काॅ-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनने १ लाख ३० हजार ९३६ क्विंटल तूर खरेदी केली अाहे. त्यापैकी ७१ काेटी ३६ लाख ३ हजार ८१६ रुपये अदा केले अाहेत. सध्या २२ हजार ८०३ शेतकऱ्यांच्या ६२ हजार ६८२ क्विंटल तुरीचे ३४ काेटी १६ लाख १८ हजार ८२५ रुपये देणे बाकी अाहे. हे चित्र केंद्रनिहाय पुढील प्रमाणे अाहे. 


काय म्हणतात पणन अधिकारी 
तूर खरेदी प्रक्रियेतील शेतकऱ्यांच्या परिपूर्ण अाहेत. केंद्र शासनाकडून राज्य सरकारकडे पैसे येतात. शेवटचे पैसे ५ मार्च राेजी प्राप्त झाले हाेते. त्यानंतर निधी उपलब्ध झालेला नाही. पाठपुरावा सुरु अाहे. - राजेश तराळे- जिल्हा पणन अधिकारी, महाराष्ट्र स्टेट काॅ-अाॅप. मार्केटिंग फेडरेशन. 


नाेंदणी केलेल्या १४ हजार २३९ पैकी ९ हजार ८१ शेतकरी माेजणीच्या प्रतीक्षेत अाहेत. अकाेटचे ५३३६, मूर्तिजापूरच्या केंद्राच्या ३७०१ शेतकऱ्यांचा समावेश अाहे. एकूण २८ हजार २१७ क्विं. तुरीचे २६ काेटी ३१ लाख १९ हजार ४६७ रुपये अदा केले. अकाेटच्या १५ हजार ६४२ क्विं. मूर्तिजापूरच्या ३२ हजार ६३५ क्विं. तूर अाहे. अकाेटची ९१५६ मूर्तिजापूरच्या १९ हजार ६१ हजार क्विं. तुरीचे १५ काेटी ७६ लाख १२ हजार ८४२ रुपये थकले अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...