आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामधील 'मध्यम निर्गुणा'सह २७ लघु प्रकल्प कोरडे ठण, पाणी टंचाईची समस्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्ह्यातील निर्गुणा या मध्यम प्रकल्पासह २७ लघु प्रकल्प कोरडे ठण पडले आहे. लघु प्रकल्प कोरडे पडल्याने ग्रामीण भागाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून जिल्ह्यात आता केवळ ६१.८८ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक राहिला आहे. 


जिल्ह्यातील २ मोठ्या ३ मध्यम, ३२ लघु प्रकल्पांतून विविध शहराची, गावांची तहान भागवली जाते. हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाते. परंतु मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने वान वगळता इतर प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे दिवाळी नंतरच पाणी टंचाईला प्रारंभ झाला. उन्हाळा सुरु झाल्याने पाण्याची मागणी वाढली तर दुसरीकडे बाष्पीभवनातही वाढ झाली. त्यामुळेच आता अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यातील मोर्णा, निर्गुणा आणि उमा हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी उमा प्रकल्प कोरडा पडला तर आता निर्गुणा देखील कोरडा पडला. त्यामुळे मध्यम प्रकल्पांपैकी मोर्णा प्रकल्पातच अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. ३२ लघु प्रकल्पांपैकी ६ लघु प्रकल्पात अत्यल्प जलसाठा असून हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे ग्रामीण भागाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून केव्हा एकदा पावसाळा सुरु होतो, याची अकोलेकर वाट पाहत आहेत. 
काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी असताना प्रकल्पात केवळ ३.३२ दलघमी जलसाठा शिल्लक राहिला आहे. 


साठवण क्षमतेच्या १८.४४ टक्के साठा 
जिल्ह्यातील प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता ३३५.५९ दलघमी आहे. तर आजमितीला केवळ ६१.८८ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. याची टक्केवारी १८.४४ टक्के होते. 

बातम्या आणखी आहेत...