आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटमध्ये कॅच पकडण्यासाठी मागे-मागे सरकला अन् काळाने खेळाडूवर घातला घाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट- वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २४ एप्रिलला स्थानिक सरफराज कॉलनी भागात घडली. या घटनेनंतर सरफराज कॉलनीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला अटक केली. 


सरफराज कॉलनीमध्ये "नसीम सर' मैदान आहे. या मैदानात काही तरुण सायंकाळी ६ वाजता क्रिकेट खेळत होते. सुमेर खान नसीर खान, वय २० वर्षे हा त्यामध्ये फिल्डिंग करत होता. खेळा दरम्यान कॅच पकडण्यासाठी सुमेर खान मागे-मागे जात होता. त्याच वेळी त्याच्या मागून ट्रॅक्टर क्र. एमएचएबी ९०७४ व ट्रॉली क्र. एमएचजे २२८३ हा वाळू घेऊन येत होता. या ट्रॅक्टरने सुमेर खानला जबर धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 


या प्रकरणी आसिफ खान जमशेर खान, वय २३ वर्षे रा. नवगज्जी प्लॉट यांनी तक्रार दिली. चालक अब्दुल तकदीर अब्दुल कदीर, रा. गांधी मैदान, अकोट याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे. 


तणावाचे वातावरण 
अपघात घडताच घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. मृतकाचे संतप्त नातेवाइक, नागरिक घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने गोळा झाले होते. पण, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके, ग्रामीण पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी सहकाऱ्यांसह परिस्थिती संयमाने हाताळून जमावाला शांत केले. घटनास्थळाहून अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रॅक्टर त्यांनी शिताफीने हलवला व चालकाला सुद्धा अटक केली. मृतक सुमेर खान हा बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याचे वडील हमाली करतात. त्याला २ भाऊ, १ बहीण व आई असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...