आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात सुरू होणार पासपोर्ट सुविधा केंद्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पासपोर्टची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी शहरात पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शहरात पोस्ट ऑफिसच्या स्वतःच्या ५ इमारती असून, त्यापैकी एका ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव विदेश मंत्री सुषमा स्वराज व विदेश मंत्रालयातील अवर सचिव ज्ञानेश्वर मुळे यांना देण्यात आला. त्या अनुषंगाने नागपूर व मुंबई येथील पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी अकोल्यातील पोस्ट ऑफिसच्या पाच ही जागांची पाहणी करून त्वरित मंजुरी देण्याचे अभिवचन दिले आहे. 


सध्या पासपोर्टच्या कामांसाठी नागपूरला जावे लागते. अकोला, बुलडाणा, वाशीम, हिंगोली व अकोल्या लगतच्या इतर तालुक्यातील नागरिकांना पासपोर्टच्या कामासाठी शहरातील हे केंद्र उपयुक्त ठरेल. जळगाव येथे पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू झाल्यानंतर खासदार संजय धोत्रे यांनी केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे यासंबंधी प्रस्ताव दिला. अकोल्यात हे केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, अकोला, अमरावती, चंद्रपूर, बारामती व माढा या ठिकाणी पासपोर्ट सुरू करण्याबाबत मंजुरीची नोट विदेश मंत्रालयातर्फे जारी करण्यात आली. अकोल्यात सिव्हिल लाईन चौक, मोठे पोस्ट ऑफिस, ताजनापेठ पोस्ट ऑफिस, कृषी नगर पोस्ट ऑफिस, व रामदास पेठ पोलीस स्टेशन जवळ पोस्ट ऑफिस या पैकी एका ठिकाणी हे सुविधा केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. खासदार संजय धोत्रे यांचे यादृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू होते. 

बातम्या आणखी आहेत...