आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्णीत सहा लाखांचा गांजा जप्त; टोळीविरोधी पथकाची कारवाई, चार आरोपींना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी (यवतमाळ)- आर्णी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काठोडा पारधी बेडा येथून चार युवक आर्णी येथे मोटारसायकल वरून गांजा विक्री करिता आणत असल्याची माहिती यवतमाळ येथील टोळी विरोधी पथकाला मिळाली. यावरून टोळी विरोधी पथकाने सापळा रचून गांजा विक्रीसाठी नेणाऱ्या चार आरोपींना अटक करून त्यांच्या जवळील 73 किलो गांजा जप्त केल्याची कारवाई केली. अरविंद किशन राठोड, सुभाष मास्तर राठोड, सोनम सुरेश चव्हाण आणि दिलीप डेडर पवार (सर्व रा. काठोडा पारधी बेडा) अशी आरोपींची नावे आहेत.

 


दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी टोळीविरोधी पथकांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्या वरून टोळी विरोधी पथकांच्या अधिकाऱ्यांनी रात्री सात वाजल्यापासून आरोपींच्या पथ्यावर होते. येथील बाबा कबलपोष दर्गाजवळ दोन दुचाकीवर पांढऱ्या रंगाच्या पोत्यात तब्बल 73 किलो सातशे ग्रॅम गांजा चार जण विक्रीसाठी नेत असल्याचे आढळून आले. दरम्यान या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडील 73 किलो सातशे ग्रॅम गांजा आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आली.  अंदाजे किंमत सहा लाख 81 हजार सहाशे रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. या घटनेची फिर्याद टोळी विरोधाचे कर्मचारी संतोष भीमराव मनवर यांनी दिली. ही कारवाई टोळी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या नेतृत्वात ऋषी ठाकुर, संजय दुबे, योगेश कटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशिष गुल्हाणे यांनी केली.

 

 

पुढील स्लाईडवर व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...