आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्याचे पीओपी कोसळले, ठाणेदार जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यातील ठाणेदारांच्या कक्षातील पीओपी कोसळले. त्यामुळे ठाणेदार अन्वर एम. शेख व दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यातील ठाणेदारांच्या कक्षातील पीओपी क्षतिग्रस्त झालेले होते. पीओपीचे काम करण्यासाठी ठाणेदारांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करून सांगितले होते. मात्र बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, आज ठाणेदार अन्वर एम. शेख यांना भेटण्यासाठी पत्रकार सचिन राऊत गेले होते. अचानक पीओपी कोसळल्याने त्याच्याखाली ठाणेदार एम. शेख, पत्रकार राऊत काहीसे दबल्या गेले. पीओपी तुटल्याने विद्युत केबलही तुटल्या होत्या. सुदैवाने केबल कुणाच्या अंगावर पडली नाही. तर प्रभारी पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी ठाणे गाठले. 


सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष 
शासकीय कार्यालये व इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. जर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या बाबत बांधकाम विभागाला कळवले असेल तर त्यांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न प्रश्न उपस्थित होत आहे. 


पीडब्ल्यूडीकडे पत्रव्यवहार केला 
पोलिस ठाण्यातील पीओपी तुटल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. दोन वर्षापासून चार ते पाच वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र आजपर्यंत कोणतेही काम न केल्यामुळे आज ही वेळ आली. 
- अन्वर एम. शेख, ठाणेदार 

बातम्या आणखी आहेत...