आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे, पालकमंत्री- जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; अन् 'डिएमअाे'वर दिली धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- शासनाच्या हरभरा व तूर खरेदी व चुकारे रखडल्याप्रकरणी शेतकरी जागर मंचने मंगळवारी अाक्रमक पवित्रा घेतला. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे अांदाेलन केल्यानंतर दुपारी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेवटी डिएमअाे (जिल्हा पणन अधिकारी अर्थात महाराष्ट्र स्टेट काॅ-अाॅप. मार्केटिंग फेडरेशन-मार्कफेड) च्या कार्यालयावर धडक दिली. दाेन्ही ठिकाणी मंचच्या नेत्यांनी तूर खरेदी पुन्हा सुरु हाेऊन चुकारे तातडीने अदा न केल्यास आणि हरभरा खरेदीची प्रक्रिया वेगाने आणि सुरळीत न केल्यास अांदाेलन छेडण्याचा इशारा दिला. याबाबत मंचातर्फे साेमवारी पुन्हा डिएमअाे कार्यालयात धाव घेऊन जाब विचारण्यात येईल, असेही शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले. 


जिल्हयातील ७५ तूर खरेदी अद्यापही झालेली नसतानाही गाेदामं इतर जिल्ह्यातील धान्यांनी भरली अाहेत. त्यामुळे शेतकरी जागर मंचने १८ मे राेजी जिल्हाधिकारी अास्तिककुमार पाण्डेय यांची भेट घेऊन त्यांना खरेदीबाबतची माहिती सादर केली हाेती. त्यानंतर मंगळवारी शेतकरी जागर मंचने धरणे अांदाेलन केले. यात मंचचे प्रशांत गावंडे, जगदीश मुरुमकार, मनाेज तायडे, राजू पाटील मंगळे, देवराव हागे, शिवाजी म्हैसने, ज्ञानेश्वर गावंडे, कपिल ढाेके,शेख अन्सार, तेजराव भाकरे, देवराव टेके, संजय गाेंदचवर, दिलीप माेहाेडे, पुरुषोत्तम राऊत, शेख सलिम शेख, सैय्यद वासिफ, मधुकर फाले, प्रमाेद पागृत अादींसह प्रहार संघटनेने नीलेश ठाेकळ, शाम राऊत, अतुल काळणे, साेपान कुटाळे, दीपक शेळके अादी अादींसह शेतकरी सहभागी झाले हाेते. भावांतर याेजना , दुष्काळी अनुदान मिळणे, साेने तारण कर्जमाफीच्या अटी रद्द कराव्यात, विनाअट व सरसकट शेतकरी कर्जमाफी कोणताही निकष न लावता देण्यात यावी, पीक विमा तातडीने देण्यात यावा, शेतकऱ्यांकडे असलेला संपूर्ण शेतमाल खरेदी करणे अादी मागण्यासाठी ४ ते ६ डिसेंबर राेजी शेतकरी जागर मंचातर्फे माजी अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर अांदाेलन करण्यात अाले हाेते. अाज २२ मे राेजी धरणे अांदाेलनात मंडपाला पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी भेट दिली. त्या अांदाेलनातील मागण्यांचा मुद्दा शेतकरी नेत्यांनी उपस्थित केला. हे सरकार नालायक असल्याचा अाराेप शेतकरी नेत्यांनी केला. त्यानंतर काही क्षणातच पालकमंत्री मंडपातून निघून गेले. 


केवळ ५५ टक्के दिवस खरेदी झाली ? 
महाराष्ट्र स्टेट काॅ-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे अकाेला, तेल्हारा, बार्शीटाकळी, पातूर, वाडेगाव, पारस या सहा केंद्रावर २ फेब्रुवारीपासून खरेदी सुरु केली. मात्र खरेदी राेज करण्यात येत नव्हती. १५ मेपर्यंत या सहा केंद्रांवर ५६४ दिवस खरेदी झाल्याचे दाखवले. मात्र १५ मे पर्यंत प्रत्यक्ष एकूण २५२ दिवस खरेदी केली. ३१२ दिवस खरेदी बंदच हाेती. केवळ ५५ टक्के दिवस खरेदी का झाली, असा सवाल शेतकरी जागर मंचने अांदाेलनादरम्यान उपस्थित केला. 


अशी अाहे हरभरा खरेदीची स्थिती
महाराष्ट्र स्टेट काॅ-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे सहा केंद्रांवर हरभरा खरेदी सुरु अाहे. या सहा केंद्रांवर २८ हजार २०० क्विं. हरभरा माेजणीविना पडून असून, माेजण्यासाठी एकूण १७ काटे अाहेत. यात बार्शीटाकळी- ५ हजार क्विं. वाडेगाव-४ हजार, पारस-१० हजार, अकाेला-५ हजार, तेल्हारा- ३ हजार ५००, पातूर येथे ७०० क्विंटल हरभरा अाहे. त्यामुळे काटे वाढवण्याची मागणी शेतकरी जागर मंचने डिएमअाेंकडे केली. 


या हाेत्या मागण्या 
- नाेंदणी झालेल्या शेतकऱ्यांची तूर व हरभरा खरेदी तातडीने पूर्ण करावी. 
- खरेदी झालेल्या तूर व हरभऱ्याचे चुकारे तातडीने द्यावे. 
- १ जूनपूर्वी खरीप हंगामातील कर्जाचे वितरण करण्यात यावे. 
- थकीत पीक विमा त्वरित अदा करण्यात यावा. 


ग्रेडरसाठी दिले पत्र 
वातावरणात बदलाने पावसाची शक्यता लक्षात घेता गोदामावर ग्रेडरची नियुक्ती करावी, असे पत्र पणन अधिकाऱ्यांनी स्टार अॅग्राेच्या व्यवस्थापकांना दिले. हरभरा खरेदी सुरु अाहे. त्यामुळे ग्रेडरने सकाळी १० ते संध्याकाळी ७ वा. पर्यंत असणे अावश्यक अाहे. असे झाल्यास गाेदामात तूर,हरभऱ्याचा वेळेत साठा शक्य हाेईल, असेही पत्रात नमूद केले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...