आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन फेसबुकफ्रेंडवर कारमध्येच केला बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - नागपूर येथील १६ वर्षाची मुलगी अकोला येथे आली. तिच्या फेसबुक फ्रेंडने तिला कारमध्ये बसवले. कार वाशीम बायपासजवळील रस्त्याच्या कडेला थांबवली व कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिला धमकी देत पैशाची मागणी करून बदनामी करण्याची धमकी दिली. बुधवारी २ मे रोजी रात्री मुलीच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिस ठाण्यात मेहकर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

 

सै. आकीब सै. युसुबअली व अफरोज (दोघेही मेहकर जि बुलडाणा.) असे आरोपींची नावे आहेत. सै आकिब याची नागपूर येथील मुलीशी फेसबुकवर ओळख झाली, १४ एप्रिलला मुलगी तिच्या नातेवाइकांकडे अकोला येथे आली असताना आरोपींनी तिला म्हटले की तुला माझे आईवडील पाहण्यासाठी आले आहेत, ते आपले लग्न करून देतात, असे म्हणून स्कॉर्पिओ गाडीत बसवून, वाशीम बायपास येथे आणले, वाहनातच आरोपीने तिचा विनयभंग केला व लैंगिक अत्याचार करून, फोनवरून, पैशाची मागणी केली व बदनामी करण्याची धमकी दिली. मुलीने तिच्या आईवडिलांना आपबीती सांगितल्यानंतर त्यांनी जुने शहर पोलिस ठाणे गाठले व आरोपी विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्यावरून कलम ३५४ ड,३७६,३८४,५०७,सह कलम बाल लैंगिक अत्याचाराचे कलम पोस्को १२,८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...