आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात दर दुसऱ्या दिवशी होतोय विनयभंग, बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- देशभरातच नव्हे, जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अकोला जिल्ह्यात दर दुसऱ्या दिवशी एकीचा विनयभंग तर दर तिसऱ्या दिवशी एका महिलेवर, मुलीवर बलात्कार होत असल्याचे पोलिस रेकॉर्डवरून समोर आले आहे. 


अकोला जिल्ह्यातील २३ पोलिस ठाण्यांतर्गत १ जानेवारी २०१८ ते ३१ मार्च २०१८ या तीन महिन्यात ३१ महिलांवर बलात्कार करण्यात आला. त्यात १२ वर्षापर्यंतच्या पाच चिमुकल्यांचा समावेश आहे. तसेच महिला आणि मुलींवरील विनयभंगाचे ६५ गुन्हे दाखल झाले आहेत. हेच प्रमाण गेल्या वर्षीच्या जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यात ४७ होते. याच तीन महिन्यात महिलांचा सासरच्या मंडळींकडून विविध कारणांसाठी शारीरिक व मानसिक छळाच्या घटना ३६ होत्या. त्या २०१८ च्या तीन महिन्यात ८६ वर पोहोचल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अकोला जिल्ह्यात लहान मुलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. काही घटनांमध्ये नात्यातील आरोपींचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. महिलांच्या घरगुती हिंसाचारा बरोबरच अपहरण आणि बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने पोलिस दलासमोर हे एक मोठे आव्हान ठरत चालले आहे.

 
गतवर्षी ६९ बलात्कार तर शारीरिक त्रासातून ९ जणींची हत्या १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ६९ महिला, युवती व अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांच्यावर जबरी शारिरीक अत्याचार करण्यात आला आहे. तर विवाहित असलेल्या १८५ महिलांचा सासरच्या मंडळींकडून विविध कारणांसाठी शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे हृदयद्रावक वास्तव आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ विवाहित महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांची हत्या झाल्याचेही वरील आकडेवारीवरून समोर आले आहे. पाच विवाहित महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहे. या घटनांमुळे समाजमन ढवळून निघत असून, या घटनांना रोखण्यासाठी ठोस कारवाई करण्याची गरज समाजामधून व्यक्त होत आहे. 

 

एका पाच वर्षाच्या आणि तीन १२ वर्षांच्या आतील मुलींवर घडल्या बलात्काराच्या घटना 
सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. तर एका विकृत मनोवृत्तीने जुने शहरात १२ वर्षाच्या आतील तीन मुलींचे लैंगिक शोषण केले. हद्द म्हणजे या नराधमाने चिठ्ठ्या काढून तिघींवर अत्याचार केले. 


वाईट मनोवृत्तीवर धाकच राहिला नाही 
अकोल्यातही गेल्या महिन्यात तीन मुलींवर बलात्कार झाला. १२ वर्षांच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची तरतूद केली. महिलांवरील अत्याचार त्या कक्षेत आणायला हवा. राज्यकर्त्यांचा वाईट मनोवृत्तीवर धाक असायला पाहिजे तो राहिला नाही. २०१९ची निवडणूक डोळ्या समोर ठेवून राजकारण केले जाते. वाईट मनोवृत्ती ठेचण्याचे काम राज्यकर्त्यांचे आहे. 
- डॉ. आशा मिरगे, माजी सदस्या, राज्य महिला आयोग. 

बातम्या आणखी आहेत...