आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेबाबत जनजागृती: गाडगेबाबांचा मूलमंत्र देणारा रथ ग्रामीण भागात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर- शहरात तीन वर्षे सतत स्वच्छता अभियान राबवून यशस्वी करून दाखवले, त्याच उद्देशाने जागोजागी स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी म्हणून संत गाडगे बाबांचा मूलमंत्र देणारा रथ ग्रामीण भागात दौरा करून स्वच्छतेसह सामाजिक कार्याचा प्रचार करत आहे. 


संत गाडगे बाबा यांनी दिलेल्या मूलमंत्राबाबत जनजागृती निर्माण व्हावी म्हणून संत गाडगेबाबांचा रथ तयार करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील नागरवाडी येथे ना. प्रवीण पोटे, आमदार बच्चू कडू, गोरक्षण संस्था प्रमुख बापूसाहेब देशमुख, संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे संचालक प्रशांत देशमुख यांनी संत गाडगे बाबांचा मूलमंत्र देणाऱ्या रथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केले. 


या रथाद्वारे बुलडाणा जिल्ह्यात बाबांच्या संदेशचा प्रचार करण्यात आला. मूर्तिजापुरात स्वच्छता अभियान यशस्वी करून दाखवण्याचा संकल्प सतीश अग्रवाल यांनी पूर्ण करून दाखवले. मूर्तिजापूर तालुक्यातील कानाडी, चिंचखेड, शेंद, सिरसो, नागोली, दाळंबी, कोळंबी, काटेपूर्णा इत्यादी ठिकाणी संत गाडगे बाबांच्या संदेशाचा प्रचार करण्यात आला. या प्रसंगी संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान मूर्तिजापूरचे प्रमुख सतीश अग्रवाल, सागर देशमुख, सुरेश काका देशमुख, दिगंबर भुगूल, अनवर खान, प्रमोद ठाकरे, सरपंच दुर्योधन राठोड, माजी पं. स. सदस्य रजनी पवार, दादाराव रामटेक, दामोदर सोनटक्के,पंजाबराव गावंडे, शालीग्राम पोळकट, विक्रम टाले, रवी खांडेकर, संतोष ठाकरे, विशाल वानखडे, विनोद देवके, पप्पू अग्रवाल, बाळू जाधव, डाॅ. बाबासाहेब कावरे, गजानन तायडे इत्यादी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...