आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम फोडून साडे 8 लाख रुपये लंपास; चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले मशीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सकाळी पोलिसांनी एटीएमस्थळाचा पंचनामा केला. - Divya Marathi
गुरुवारी सकाळी पोलिसांनी एटीएमस्थळाचा पंचनामा केला.

बार्शिटाकळी- बायपास बार्शिटाकळी ते मंगरुळपीरकडे जाणाऱ्या मार्गाजवळील स्टेट बँक शाखा बार्शिटाकळीचे एटीएम बुधवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून ८ लाख ४८ हजार ३०० रुपये लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. 


बार्शिटाकळी बायपास मार्गावर स्टेट बँकेची बार्शिटाकळीची शाखा आहे. येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये बुधवार, १३ डिसेंबर रोजी दुपारी वाजता १० लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, १३ रोजी रात्री वाजताच्या सुमारास एटीएम पाॅवर बंद झाले. त्यामुळे ग्राहकांचे जाणे-येणे बंद झाले. दरम्यान, रात्री दीड वाजताच्या सुमारास गॅस कटरचा वापर करून एटीएम फोडून लाख ४८ हजार ३०० रुपये चोरट्यांनी लंपास केले. 


गुरुवार, १४ डिसेंबरला सकाळी एटीएम फोडल्याचे समजले. याची माहिती कळताच बार्शिटाकळी पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अकोला येथून श्वान पथकाला एटीएमसमोर पाचारण करण्यात आले. त्या वेळी श्वान स्टेट बँक परिसर फिरून नंतर बायपास रोडवर थांबला. कारवाईवेळी घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी कल्पना भराडे, उप पोलिस अधीक्षक परिविक्षाधीन राहुल धस, पोलिस निरीक्षक तिरुपती राणे, पीएसआय संजय सोनवणे, पीएसआय खांडवाये, खुफीया पोलिस भास्कर सांगळे, पोलिस निरीक्षक आर. पी. रिडे, चॅनल मॅनेजर राहुल गवळी, एलसीबी पोलिस निरीक्षक नागरे, उपस्थित होते. बार्शिटाकळी तालुक्यात काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रात्री पोलिसांची गस्त असूनही चोरटे सक्रीय झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...