आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विद्यापीठामध्ये मृदा दिनी कार्यक्रम; मृद जल संधारणाठी एकत्र येण्याची गरज: डॉ. भाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्थेची अकोला शाखा मृद विज्ञान, कृषी रसायनशास्त्र विभागातर्फे मृदा दिन साजरा केला. कुलगुरु डॉ. विलास भाले प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी डॉ. विजय खर्चे, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, पंजाबराव बोचे, भास्कर वानखडे, प्रदीप ठाकूर, डॉ. राजेंद्र काटकर, वरिष्ठ प्रा. डॉ. व्ही. डी. गुळदेकर उपस्थित होते. 


मृद विज्ञान संस्थेतर्फे तीन महिन्यात घेतलेल्या प्रश्नमंजुषा, भित्तीपत्रक स्पर्धा, वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरीत केले. अकोट येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप केले. डॉ. भाले यांनी, नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन आवश्यक असल्याचे सांगून मृद जल संधारण, स्वच्छतेसाठी एकत्र येण्याची गरज आहे असे सांगितले. पंजाबराव बोचे यांनी केळी निर्यात कार्यक्रमाविषयी माहिती दिली. 


डॉ. खर्चे म्हणाले, मातीची होत असलेली धूप, मृदा संवर्धनाचे उपाय, विद्यार्थ्यांचा सहभाग यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र काटकर यांनी केले. संचालन डॉ. नितीन कोंडे तर आभार डॉ. एस. डी. जाधव यांनी मानले. डॉ. पी. डब्ल्यू. देशमुख, डॉ. डी. व्ही. माळी, डॉ. एस. एस. हाडोळे, डॉ. बी. ए. सोनुने, अशोक आगे, आेमप्रकाश राखांडे, दिलीप नलगे, दीप्ती आगरकर, सूरज लाखे, देवेन देशमुख, नरेंद्र डागे यांचा आयोजनात सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...