आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापुरात राज्य पेन्टाक्यु अजिंक्यपद स्पर्धा; स्पोर्टस झोन ऑफ मलकापूरची यंत्रणा कार्यान्वीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेन्टाक्यु स्पर्धेचे संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
पेन्टाक्यु स्पर्धेचे संग्रहित छायाचित्र

मलकापूर- महाराष्ट्र राज्य पेन्टाक्यु असोसिएशन अंतर्गत जिल्हा पेन्टाक्यु असोसिएशन यांच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यस्तरीय १० वी ज्युनिअर पेन्टाक्यु राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा २४ ते २६ डिसेंबर दरम्यान संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनात स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरची यंत्रणा कार्यान्वीत राहणार असल्याची माहिती स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे सचिव विजय पळसकर यांनी दिली. 


पेन्टाक्यु हा खेळ गेल्या अनेक वर्षापासुन राज्यात मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. बुलडाणा जिल्हा संघटनेचे सहा खेळाडु मुले तिन खेळाडु मुलींनी आजपर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. पेन्टाक्यु या खेळाची १९ वर्षाखालील मुले मुली राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेच्या स्वरुपात मलकापूर शहरातील क्रीडा शौकिनांना बघावयास मिळणार आहे. 


या स्पर्धेचे आयोजन मलकापूर येथे तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील २२ ते २४ जिल्ह्यांचा संघासह ३०० ते ३५० खेळाडूंचा सहभाग राहणार आहे अशी माहिती बुलडाणा जिल्हा पेन्टाक्यु संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराजे जाधव, सचिव नीलेश इंगळे यांनी दिली. या स्पर्धेसाठी जिल्हा संघटना स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्या माध्यमातुन सर्व खेळांना, तांत्रिक समिती सदस्य, जिल्हा संघटनेच्या सचिवांना सुविधा पुरवणार आहे. 


या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतुन महाराष्ट्र संघ निवडला जाणार असून, हा संघ १३ ते १५ जानेवारी दरम्यान गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये आ. चैनसुख संचेती, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, भरत दंड, संमती जैन, शिवराज जाधव, आयोजन समितीचे सचिव विजय पळसकर, स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे अध्यक्ष नितीन भुजबळ, महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव प्रदीप साखरे, प्रा. डॉ. कैलास पवार, अतुल जगदाळे, प्रफुल्ल वानखेडे, जितेंद्र मराठे, संजय जाधव तसेच सर्व शाळेचे क्रीडा शिक्षक यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...