आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल्यांमध्ये अनियमितता: शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोला जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याच्या विरोधात गुरुवार, ७ जून रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे देऊन प्रश्नाचा गुंता सुटावा, अशी मागणी करण्यात आली. 

 

बदलीसंदर्भात २७.२.१७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ नुसार शाळानिहाय रिक्त जागा घोषित केल्या नाहीत, ३ नुसार रिक्त ठेवायची पदे कोणती आहेत त्या शाळांची यादी, शाळांवरील शिक्षकांची यादी जाहीर नाही. शिक्षकांचा प्राधान्यक्रम व त्यांच्या पसंतीक्रमानुसार बदल्या करण्यात आल्या नाहीत, अपात्र शिक्षकांना बदलीचा अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून दर्जा मिळाल्याने अनेक शिक्षक विस्थापित झालेत, धुळे, बुलडाणाप्रमाणे शिक्षकांची यादी जाहीर नाही या प्रमाणे एकूण १९ मुद्द्यांवर शिक्षकांच्या समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. उपरोक्त बाबींचा विचार करता जि. प. शिक्षक बदली शासन निर्णय २७ फेब्रुवारी २०१७ नुसार व शासनाने वेळोवेळी केलेल्या आदेशानुसार कार्यवाही झालेली नसल्याने बदली प्रक्रियेत अनियमितता झाली असून शिक्षकांवर अन्याय झाल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यांना भेदभावाची वागणूक मिळाली आहे. 


गैरलाभ घेतलेल्या शिक्षकांमुळे विस्थापित शिक्षकांची संख्या वाढून बदली होणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण वाढलेले आहे. विस्थापित शिक्षकांना पदस्थापना मिळण्यासाठी विषय शिक्षकांच्या नियुक्त्या होणे आवश्यक आहे. तसेच बदली प्रक्रियेतील अनियमितता दूर झाल्याशिवाय शिक्षकांवरील अन्याय दूर होणार नाही. न्याय मागण्यांचा विचार झाला नाही तर न्यायालयात दाद मागावी लागेल, असेही म्हटले आहे. धरणे देणाऱ्यांमध्ये म. रा. प्राथमिक शिक्षक समितीचे नामदेवराव फाले, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शशिकांत गायकवाड, म. रा. शिक्षक सेनेचे देवानंद मोरे, म. रा. शिक्षक परिषद (प्राथ.) प्रकाश चतरकर, म. रा. प्राथमिक शिक्षक संघाचे संजय भाकरे, प्राथमिक शिक्षक संघाचे विजय भोरे, अ.भा. प्राथमिक शिक्षक संघाचे रजनीश ठाकरे, जुनी पेंशन हक्क संघटनेचे रामदास वाघ, बहुजन शिक्षक महासंघाचे एम. एम. तायडे, विस्थापित शिक्षक समितीचे शैलेंद्र गवई, उर्दू शिक्षक संघटनेचे अख्तरउल अमीन, अपंग कर्मचारी संघटनेचे रवींद्र देशमुख आदींचा समावेश होता. 

बातम्या आणखी आहेत...