आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणा : शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कृषी सुधारणा याेजनांमध्ये अव्वल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती -  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात कृषी क्षेत्रात ५० पेक्षा जास्त योजना यशस्वीरीत्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे ज्या परिसरात सिंचनाच्या सुविधा नाहीत त्या परिसरातही कृषी क्षेत्राने मोठा पल्ला गाठला आहे. राव यांनी मुख्यमंत्रिपदाच्या त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात तेलंगणामध्ये कृषी क्षेत्राला नफ्यातील व्यवसाय बनवले आहे.

 

त्यामुळे राज्यातील जनता त्यांच्याकडे आत्महत्या, बाजारात पिकाची विक्री, पीक विमा, पीक सबसिडीमध्ये दलालांची फसवणूक यापासून शेतकऱ्यांची मुक्ती करणारे रक्षक म्हणून पाहत आहे. राव सांगतात की, “मी स्वत: एक शेतकरी आहे. शेतीमध्ये पेरणीपासून ते मंडईमध्ये पिकाच्या विक्रीपर्यंत कोणत्या अडचणी येतात, त्या मला चांगल्या प्रकारे 
माहिती आहेत.’  


तेलंगणा शेतकऱ्यांच्या हिताच्या कृषी सुधारणेत अव्वल स्थानी आहे. नीती आयोगाच्या वतीने नुकत्याच जाहीर झालेल्या “अॅग्रिकल्चर मार्केटिंग अँड फार्मर फ्रेंडली रिफॉर्म’ निर्देशांकात तेलंगणा अव्वल - १० मध्ये आहे. राज्यात शेतीसाठी २४ बाय ७ मोफत वीज दिली जाते. कृषी कर्ज माफी देण्यात अाली आहे. “रायतू बंधू’ नावाची शेतकरी गुंतवणूक समर्थन योजना सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रतिपीक ४००० रुपये प्रति एकरच्या हिशेबाने एकूण ८००० कोटी रुपये धनादेशांच्या माध्यमातून सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत.

 

हे पूर्ण काम मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या देखरेखीखाली होत आहे. राज्यात शेतीसाठी  करण्यात आलेल्या अत्याधुनिक औद्योगिकीकरणामुळे केवळ कृषी उत्पादकताच वाढली नाही, तर प्रतिव्यक्ती उत्पन्नही वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...