आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीपीसीच्या जागांसाठी आज मतदान; 15 उमेदवार निवडणूक रिंगणात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हानियोजन समितीच्या (डीपीसी) १४ पैकी सात जागांसाठी शुक्रवार २९ डिसेंबरला सकाळी ते सायंकाळी या वेळेत मतदान होत आहे. जिल्हाभरातील मतदारांना अकोल्यात येऊन तीन मतदान केंद्रांवर मतदान करावे लागणार आहे. 


तहसील कार्यालयात ५२ जिल्हा परिषद सदस्य मतदान करतील. तर जिल्हािधकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात मनपाच्या ८० आणि सेतू केंद्रात जिल्ह्यातील पाचही नगरपरिषदेच्या ११८ सदस्यांना मतदान करावे लागेल. या मतदानासाठी मतपत्रिका असून त्यावर संबंधितांना पसंतीक्रम नोंदवायचा आहे. 


जिल्हा परिषद (ग्रामीण), मनपा (माेठे नागरी) तसेच नगर परिषद (लहान नागरी) अशा तीन मतदारसंघांतून जिल्हा नियाेजन समितीच्या सदस्यांची निवड केली जाते. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र टापरे यांनी घोषित केला आहे. त्यानुसार मनपातून सात, जिल्हा परिषदेतून चार आणि नगरपरिषदेतून तीन अशा १४ जणांची निवड करावयाची होती. यापैकी सात जागी उमेदवारांची अविराेध निवड झाल्यानंतर सुद्धा उर्वरित सात जागांसाठी निवडणूक हाेणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एक, नगर परिषदेच्या दाेन तर महापालिकेच्या चार जागांचा समावेश आहे. 


जि.प. अनु. जाती मतदारसंघात सरलाबाई मेश्राम (गुडधी) महादेव गवळे (गांधीग्राम) यांच्यात थेट लढत असून महापालिकेच्या चार जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गात शाहीनान्जुम मेहबूब खान, शितल गायकवाड शारदा ढाेरे तर सर्वसाधारण प्रवर्गात विजय अग्रवाल, मंगेश काळे राजेंद्र गिरी यांच्यात लढत होईल. यापैकी प्रत्येकी दोन उमेदवार विजयी होतील.न.प.च्या दोन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. गंगा चंदन, रेशमा अंजुम अफजलखान, सुनीता भुजबले या महिला एका मतदारसंघात लढत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...