आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेबाबत कार्यशाळा; नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पाऊस अधिक प्रमाणात यावा, यासाठी जसे वृक्षसंवर्धन गरजेचे आहे. त्याच प्रमाणे छतावर कोसळणारा पाऊस जमिनीत जिरवणेही गरजेचे आहे. गेल्या काही वर्षापासून भुजलाचा उपसा सुरु आहे. भुजलाच्या पातळीत वाढीसाठी प्रयत्न होत नाही. या अनुषंगानेच नागरिकांनी पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी दै. दिव्य मराठी, मातोश्री ज्येष्ठ नागरिक संघ,गोरक्षण रोड विकास समिती, माजी नगरसेवक गोपी ठाकरे यांच्या तर्फे २३ मे रोजी गोरक्षण मार्गावरील मातोश्री सभागृहात सायंकाळी सहा वाजता रेन वॉटर हार्वेस्टिंगचे फायदे यावर कार्यशाळा आयोजित केली आहे. 


२५ वर्षापूर्वी जमिनीत २५ ते ३० फुटावर पाणी मिळत होते. आता ८० ते १०० शंभर फुटापर्यंत पाणी मिळत नाही. पावसाचे पाणी जमिनीत न जिरवल्यास पुढच्या पिढीला जमिनीतील पाणी मिळणार नाही. त्यामुळे आज प्रत्येक घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवणे गरजेचे आहे. मात्र अनेकांना ही योजना कशी राबवावी? या योजनेचे फायदे काय? पाणी जमिनीत जिरवल्यानेे घराला क्षती पाेहोचेल का? आदी शंका येतात. या शंका दूर करुन रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करावे? ते गरजेचे का? याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.शंकांचे समाधानही करणार आहेत. हे लक्षात घेऊन नागरिकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नगरसेवक गोपी ठाकरे तसेच आयोजकांनी केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...