आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकरवर सहा कोटी रुपयांची होणार लूट; जिल्ह्यात उरला फक्त 35.83 दलघमी जलसाठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात आजच्या घटकेला ११.७५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध साठ्यातून जुलैपर्यंत शहराची तहान भागवणे शक्य आहे. मात्र तरीही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करुन पाणीटंचाईच्या नावाखाली १४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यात सहा कोटी रुपये केवळ टँकरने पाणीपुरवठा करण्यावर खर्च केले जाणार आहेत. तसेच आराखड्यात केवळ बोअर व हातपंपावरच भर देण्यात आला आहे. शहराला कायम स्वरुपी लाभदायी ठरतील, अशा उपाय योजनांचा समावेश या आराखड्यात नसल्याने हा आराखडा केवळ जमिनीला छिद्र पाडण्यापुरताच ठरला आहे. 


यावर्षी पावसाने दडी दिल्याने काटेपूर्णा प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे महापालिकेला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करावा लागत आहे. तुर्तास काटेपूर्णा प्रकल्पात ११. ७५ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यावर्षी इतर कोणत्याही प्रकल्पांना तसेच सिंचनाला पाणी मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळे उपलब्ध पाणी केवळ महापालिकेलाच जुलैपर्यंत वापरावे लागणार आहे. तुर्तास काटेपूर्णा प्रकल्पातून दररोज होणारी पाण्याची उचल, उपलब्ध जलसाठा, होणारे बाष्पीभवन या सर्व बाबी लक्षात घेतल्यास उपलब्ध साठ्यातून पाणी वितरणाचे काटेकोरपणे नियोजन केल्यास जुलैपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो. किमान जूनपर्यंत पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे पाणीटंचाईचा फायदा घेऊन महापालिकेने धडक उपाय योजना आराखड्यात आखणे अपेक्षित होते. मात्र या आराखड्यात 'टिपिकल' विहिरीचे खोलीकरण, अधिग्रहण, टँकर, हातपंप घेणे यावरच भर दिला आहे. शहरात आधीच ३५०० सार्वजनिक हातपंप असताना पाणीटंचाई आराखड्यात ७८५ ठिकाणी बोअर अथवा हातपंप करण्याचे नियोजन केले आहे. यावर २ कोटी ६६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याच बरोबर अकोला-महान मार्गावर ३६ ठिकाणी बोअरचे नियोजन करण्यात आले आहे. 


या उपाय योजनांकडे दुर्लक्ष
कापशी तलावातील गाळ काढून खोली वाढवणे तसेच वान प्रकल्पात शहरासाठी ९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले असले. आरक्षित पाणी शहरापर्यंत कमी वेळात पोचवणे शक्य नाही. वान ते अकोला जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. 


अशा आहेत उपाय योजना 
अकोला ते महान मार्गावर मुख्य जलवाहिनी लगत ३६ ठिकाणी बोअर, ६० विहिरींचे खोलीकरण, ४० विहिरी अधिग्रहित करणे, प्रत्येक प्रभागात टॅंकरने पाणी पुरवठा, ५८५ बोअरची दुरुस्ती, सहा ठिकाणी कुपनलिका, ७८५ नवीन हातपंप, नळ योजना दुरुस्ती यावर १४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

 
असे होणार पाणीपुरवठ्याचे नियाेजन 
काटेपूर्णा प्रकल्पात ११. ७५ दलघमी जलसाठा आहे. महापालिका महिन्याकाठी १.२५ दलघमी पाण्याची उचल करीत आहे. या नुसार जुलै महिन्यापर्यंत ८.१५ दलघमी पाण्याची उचल केली जाईल. उपलब्ध जलसाठ्यातून ३० टक्के (३.१८ दलघमी) पाण्याचे बाष्पीभवन होईल. या शिवाय काटेपूर्णा प्रकल्पाच्या मृतसाठ्याची पातळी ११ दलघमी आहे. यात ६ दलघमी गाळ साचला आहे. त्यामुळे गरज भासल्यास ५ दलघमी पाण्याची उचल करता येते. परिणामी योग्य नियोजन केल्यास काटेपूर्णा प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्यावरच जुलै पर्यंत पाणी पुरवठा करता येणे शक्य आहे. तसेच या दरम्यान काही प्रमाणात का होईना पाऊस होईल आणि धरणाच्या पातळीत थोडीफार वाढ होणारच आहे. त्यामुळे पाणी टंचाई आराखड्यात एप्रिल ते जुन दरम्यान प्रत्येक प्रभागात टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले असून यासाठी ६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 


असे होणार पाणीपुरवठ्याचे नियाेजन 
काटेपूर्णा प्रकल्पात ११. ७५ दलघमी जलसाठा आहे. महापालिका महिन्याकाठी १.२५ दलघमी पाण्याची उचल करीत आहे. या नुसार जुलै महिन्यापर्यंत ८.१५ दलघमी पाण्याची उचल केली जाईल. उपलब्ध जलसाठ्यातून ३० टक्के (३.१८ दलघमी) पाण्याचे बाष्पीभवन होईल. या शिवाय काटेपूर्णा प्रकल्पाच्या मृतसाठ्याची पातळी ११ दलघमी आहे. यात ६ दलघमी गाळ साचला आहे. त्यामुळे गरज भासल्यास ५ दलघमी पाण्याची उचल करता येते. परिणामी योग्य नियोजन केल्यास काटेपूर्णा प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्यावरच जुलै पर्यंत पाणी पुरवठा करता येणे शक्य आहे. तसेच या दरम्यान काही प्रमाणात का होईना पाऊस होईल आणि धरणाच्या पातळीत थोडीफार वाढ होणारच आहे. त्यामुळे पाणी टंचाई आराखड्यात एप्रिल ते जुन दरम्यान प्रत्येक प्रभागात टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले असून यासाठी ६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 


'त्या' बोअर गेल्या कुठे? 
२००४-२००५ साली काटेपूर्णा प्रकल्पाने मृतसाठ्याची पातळी गाठली होती. त्यावेळी खऱ्या अर्थाने तिव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने मुख्य जलवाहिनी लगत ३६ ठिकाणी बोअर करुन बोअरमधील पाणी जलवाहिनीत सोडण्यात आले होते. त्या बोअरवरील सबमर्सिबल पंप काढून घेण्यात आले होते. आता पुन्हा ३६ ठिकाणी बोअर घेतली जाणार आहे. त्यामुळे त्या आधीच्या बोअर कुठे गेल्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 

जिल्ह्यातील १८ लघुप्रकल्प पडले काेरडे,'मध्यम'नेही गाठला तळ 
जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील एकूण साठवण क्षमतेच्या केवळ ३५.८३ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांची साठवण क्षमता ३३५.५९ दलघमी असून, तुर्तास केवळ १२०.२५ दलघमी जलसाठा राहिला आहे. विशेष म्हणजे १८ लघु प्रकल्प कोरडे पडल्याने ग्रामीण भागाला आतापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 


जिल्ह्यात काटेपूर्णा आणि वान हे दोन मोठे प्रकल्प आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्याने काटेपूर्णा प्रकल्पात अत्यल्प जलसाठा उपलब्ध झाला. तर वान प्रकल्प वगळता अन्य कोणत्याही प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध होऊ शकला नाही.परिणामी रबीच्या हंगामातही शेतकऱ्यांना पीक घेता येणार नाही. त्यामुळे रबीतील कोट्यवधीची उलाढाल मंदावणार आहे. तर ग्रामीण भागात सिंचनासह जनावरांच्या पिण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या ३२ लघु प्रकल्पांपैकी १८ लघु प्रकल्प कोरडे पडले असून अन्य लघु प्रकल्पातही अत्यल्प जलसाठा राहिला आहे. त्यामुळे अकोला पाटबंधारे विभागाने पाण्याचा वापर जपून करावा तसेच पाण्याची बचत करावी, असे आवाहन केले आहे. 


कोरडे पडलेले हेच ते १८ लघु प्रकल्प 
अकोला तालुक्यातील बोरगाव,सिसा उदेगाव, कुंभारी, सुकळी, अकोट तालुक्यातील शहापूर बृहत, मूर्तिजापूर तालुक्यातील पिंपळशेंडा, बार्शिटाकळी तालुक्यातील जनुना, घोटा, मोझरी, झोडगा, मोऱ्हळ, हातोला, दगडपारवा, पातूर तालुक्यातील गावंडगाव, सावरगाव बांध, हिवरा, बाळापूर तालुक्यातील कसुरा, तामसी असे १८ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...