आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, म्हणून अंगावर रॉकेल टाकून जाळले पत्नीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दारूड्या पतीने पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नीजवळ पैसे नसल्याने ती देऊ शकली नाही. पतीला तिचा राग आला. त्याने घरातील रॉकेल तिच्या अंगावर ओतले. त्यात ती ९० टक्के भाजली. उपचारादरम्यान मात्र तिचा मृत्यू झाला. महिलेला एक १५ वर्षाची मुलगी आहे. 

 

वर्षा प्रदीप भुबंरकर (४०)   या १५ वर्षीय मुलीसोबत राहत होत्या. मुलीने दहावीची परीक्षा दिली होती. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी वर्षा भुबंरकर या छोटेमोठे काम करीत होत्या. त्यांचा पती प्रदीप भुबंरकर हा मोर्शी' येथे राहत होता. तो कधीकधीच अकोल्यात येत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे तो पत्नीसोबत नेहमीच वाद घालत होता. त्या घरी काम करीत असताना गुरुवारी दुपारी त्यांचा पती प्रदीप घरी आला. त्याने पत्नीला दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यांच्याजवळ पैसे नसल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. 


त्यामुळे राग अनावर झाल्याने प्रदीपने पत्नी वर्षाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवून दिले व तो घरातून पसार झाला. आगीतून वाचवण्यासाठी त्या ओरडत होत्या. शेजाऱ्यांनी आवाज ऐकून त्यांच्या घराकडे धाव घेतली. आग विझवित वर्षा'यांना सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ'दाखल केले. घटनेची माहिती खदान पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांना मिळाली. या आगीमध्ये वर्षा या ९० टक्के जळाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. पोलिसांसमक्ष दिलेल्या जबानीमध्ये त्यांनी घटनेची सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी पती प्रदीपविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न यावरून गुन्हा दाखल केला. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाल्याने पोलिसांनी पती प्रदीप विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर पती हा फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...