आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा पाण्यासाठी भाजप अामदारांच्या घरासमाेर ठिय्या, नगरसेवकाचे लोटांगण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- सायंकाळी शिवसेना नगरसेवक शशिकांत चाेपडे यांनी भाजप अामदार गाेवर्धन शर्मा यांच्या घरासमाेर लाेटांगण घेतले. पाण्याची समस्या सुटण्यासाठी धाव घेणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश हाेता. महिलांनी अा. शर्मा यांच्या घरासमाेरच ठिय्या दिला. पाण्याची समस्या लक्षात घेता अामदार शर्मा यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर अाता या अाठवड्यात बाेअरवेलच्या कामाच्या प्रक्रियेला प्रारंभ हाेणार अाहे. 


दाेन महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याचे महिलांचे म्हणणे हाेते. त्यानंतर तेथे अा. शर्मा यांनी सर्वांशी संवाद साधत पाण्याची समस्या तातडीने निकाली काढण्याची ग्वाही दिली. 


असे फिरले चक्र
नागरिकांच्या भावना अा. शर्मा यांनी जाणून घेतल्या. त्यांनी तातडीने प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे अाहे. अधिकाऱ्यांही तातडीने बाेअरवेलच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. 


काय म्हणतात अा. शर्मांचे समर्थक व सेना नगरसेवक
सन २००३ मध्ये अा. गाेवर्धन शर्मा यांनी शहरात १११ बाेअरवेलची कामे पूर्ण केली हाेती. त्यामुळे अाताही शहरात पाण्याची समस्या सुटण्यासाठी लवकरच सर्वेक्षण करुन तातडीने उपाययाेजना करण्यात येणार अाहेत. मात्र, शिवसेनेचेही लाेकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेत असताना त्यांनी पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी काेणते प्रयत्न केले, असा सवाल भाजप नेते व अा. शर्मा यांच्या समर्थकांकडून उपस्थित करण्यात येत अाहेत. मी पाण्याच्या समस्येसाठी अामदार शर्मा यांची अनेकदा भेटली घेतली अाहे, असे नगरसेवक शशिकांत चाेपडे म्हणणे अाहे. मात्र, समस्या सुटली नसल्याने रविवारी मी नागरिकांना साेबत घेत अा. शर्मा यांच्या घरी अालाे. लाेटांगण करत ठिय्याही दिला. शिवसेना नेते अामदार गाेपीकिशन बाजाेरीया यांनी त्यांच्या निधीतून तीन बाेअरवेल मंजूर केल्या अाहेत. 


अा. शर्मा यांनी साधला संवाद 
अामदार गाेवर्धन शर्मा यांनी नागरिकांशी संवाद साधला. अापण कधीही बाेअरवेलसाठी नाही म्हटले नसून, अाज सकाळी ज्ञानेश्वर नगरात एका बाेअरवेलला मंजुरी दिली, असे ते म्हणाले. पाणी टंचाईच्या कामाला प्रशासकीय मान्यतेसह काही वेळ लागताे. बाेअरवेलला अाठ- दहा दिवस लागणार कि नाही, असा सवाल उपस्थित करीत ताेपर्यंत पाणी पुरवठा करणे नगरसेवकाचे काम अाहे, असेही ते म्हणाले. मात्र अशा पद्धतीने महिलांना येथे घेऊन येणे याेग्य नाही. नगरसेवक चाेपडे यांचे काम व्यवस्थित नाही, असेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...