आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाळा, अलादतपूर येथील जि.प.शाळा बंद, ग्रामस्थांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हातगाव  - सोनाळा येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण १४ विद्यार्थी पटावर असून, शाळा बंद झाल्यामुळे या शाळेतील मुलांचे शिक्षण बंद झाले आहे. दरम्यान या मुलांचे पालक आपल्या मुलांना दुसरीकडे पाठवायला तयार नसून, शासनाने शाळा बंद करु नये, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

 

अलादतपूर येथील शाळेतील पटावर १२ मुले असून, प्रगत शाळा बंद पडल्यामुळे मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की एकही शाळा बंद होऊ देणार नाही. मग या दोन्ही शाळा कशा कोणाच्या आदेशाने बंद झाल्या, असा प्रश्न मुलांसह त्यांच्या पालकांना पडला आहे. या दोन्ही शाळा सुरु करण्यात याव्या,अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

 

पटसंख्या कमी असलेल्या अन्य शाळा अद्यापही सुरु : दरम्यान अन्य ज्या शाळा बंद झाल्या नाही, त्यांची पटसंख्या खूपच कमी असून, त्या शाळा अद्यापही सुरु आहेत. त्यात लसनापूर पटसंख्या २, जामठी ५, आरखेड , पलसोडा ११ अशी कमी पटसंख्या असूनही येथील शाळा सुरु असून, सोनाळा शाळेची पटसंख्या १४ तर अलादतपूर शाळेची पटसंख्या १२ असूनही शासनाने या शाळा बंद केल्या आहेत, हे विशेष.

 

दरम्यान, संदीप मोरे, अलादतपूर, अरुण इंगळे, सोनाळा, रंजीता कौर बाजहिरे ग्रामस्थांनी शाळा बंद करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

 

सीईओंचा आदेश
दरम्यानया संदर्भात सोनाळा केंद्रप्रमुखांना सीईआेंचा आदेश आला. केंद्रप्रमुखांनी मुख्याध्यापकांना जानेवारीला दुपारी वाजता आदेश देऊन हातगाव येथे समायोजन करण्यास सांगितले. या शाळेमध्ये मुली, मुले आणि दोन शिक्षक आहेत. दरम्यान अलादतपुरलाही असाच केंद्र प्रमुखांचा आदेश आला आणि गौलखेडी येथे समायोजन करण्यास सांगितले, तिथेही दोन शिक्षक आणि १२ विद्यार्थी होते,अशी माहिती शाळेतील सूत्रांनी दिली.

 

३७ वर्षानंतर बंद करण्यात आली शाळा
मूर्तिजापूर पंचायत समितीच्या नागठाणा केंद्राअंतर्गत येणाऱ्या सोनाळा येथील जिल्हा परिषदेच्या या शाळेची स्थापना १८ ऑगस्ट १९८१ रोजी करण्यात आली होती. ही शाळा आता पटसंख्येअभावी ३७ वर्षानंतर बंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...