आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाख 16 हजार शेतकऱ्यांचे कर्ज 8 महिन्यांमध्ये झाले माफ, 21 हजार शेतकरी प्रतीक्षेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - गतवर्षी जाहीर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेअंतर्गत अातापर्यंत अाठ महिन्यात १ लाख १६ हजार ५४९ शेतकऱ्यांचे ४८९ काेटी १९ लाख ७३ हजार रुपयांचे कर्जमाफ करण्यात अाले अाहे. अद्यापही गतवर्षीच्याच २१ हजार ४५१ शेतकरी प्रतीक्षेत असून, अर्ज निकाली काढण्याची संथ गती लक्षात घेता राज्य शासनाने सन २००१ ते २००९पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी हाेईल आणि प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळेल, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत अाहे.

 

शेतकरी कर्जमाफीसाठी गतवर्षी शेतकऱ्यांनी संप केला हाेता. या अांदाेलनात विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांनाही उडी घेतली हाेती. अांदाेलनादरम्यान शेतकऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर टाकून निषेध व्यक्त केला हाेता. परिणामी शासनाला शेतकरी कर्जमाफी जाहीर करावी लागली हाेती. मात्र यात निकष व अटींचा भरणा असल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड राेष व्यक्त केला हाेता. त्यामुळे शासनाला राेज नवीन अादेश जारी करावे लागत हाेते.

 

कर्जमाफीच्या कामाला गती येईना
गतवर्षी जाहीर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेअंतर्गत ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ५६ शेतकऱ्यांचा सपत्नीक प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान केला हाेता. याप्रसंगी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या १ लाख ९१ हजार १८७ अर्जपात्र असल्याचे सांगण्यात अाले. मात्र नंतरच्या काळात अटी-निकष जारी झाले. त्यामुळे अातापर्यंत १ लाख ३८ हजार पात्र अर्जांपैकी १ लाख १६ हजार ५४९ शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरवून त्यांना कर्जमाफी दिली. त्यामुळे दुसरा हंगाम सुरु झाल्यानंतरही शेतकरी कर्जमाफी केव्हा पूर्ण हाेईल, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत अाहेे.

 

बातम्या आणखी आहेत...