आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वाहनांसह 11 लाख रुपयांचा गुटखा डोणगावनजीक पकडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोणगाव - प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी पकडली. यावेळी त्या वाहनातून पोत्यात भरलेला १० लाख ७६ हजार रुपये किमतीचा न्यू बाजीराव गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई ११ जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास डोणगाव मेहकर रोडवरील हॉटेल मयुर जवळ करण्यात आली. प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या धडक कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन वाहनाव्दारे शासनाने विक्री, उत्पादन व साठवणुकीसाठी प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सहायक पोलिस निरीक्षक आकाश शिंदे, विष्णू जायभाये, सुनील देशमुख, डिगांबर चव्हाण यांनी डोणगाव मेहकर रस्त्यावरील मयुर हॉटेल जवळ सापळा रचला. यावेळी एम.एच. २७/ एक्स ७८२३ व एम.एच. २७/ एक्स/ ८५१२ या दोन पिकअप वाहनांना थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये अमरावती शहरातील रहमत नगरातील इम्रानखान समीरखान २६ व सलमानखान अफरोजखान वय २० हे दोघे तर दुसऱ्या वाहनात शेख ऐफास शेख जाफर वय २३ व शेख रहिम शेख रशीद वय १९ रा यासीननगर अमरावती हे दोन जण बसलेले दिसून आले. यावेळी त्यांच्या ताब्यातून पोत्यात भरलेला प्रतिबंधित न्यू बाजीराव गुटखा व दोन वाहने असा एकूण १० लाख ७६ हजार रुपया माल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मिना, अप्पर पोलिस अधीक्षक डोईफोडे व उपविभागीय पोलिस अधिकारी वैजंणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आकाश शिंदे, विष्णू जायभाये, दिलीप राठोड, डिगांबर चव्हाण, सुनील देशमुख व अंभोरे यांनी केली आहे. पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...