Home | Maharashtra | Vidarva | Akola | 11 small project of district Outflow out of 36

जिल्ह्यातील ३६ पैकी ११ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो, आठ प्रकल्प अद्याप तहानलेलेच; पावसाची प्रतीक्षा

प्रतिनिधी | Update - Jul 28, 2018, 11:55 AM IST

जिल्ह्यातील ३६ लघु प्रकल्पांपैकी ११ लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर ८ लघु प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.

 • 11 small project of district Outflow out of 36

  अकोला- जिल्ह्यातील ३६ लघु प्रकल्पांपैकी ११ लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर ८ लघु प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. तसेच जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पात अद्यापही मुबलक जलसाठा उपलब्ध झालेला नाही. परिणामी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहेच.


  जिल्ह्यात ३६ लघु प्रकल्प आहेत. विशेष म्हणजे लघु प्रकल्प हे ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन तसेच पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांप्रमाणेच लघु प्रकल्पाच्या साठ्याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले असते. यावर्षी गतवर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. मात्र अधिक पावसाची नोंद होऊनही साठवण क्षमतेच्या ३८.३० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. मोठ्या, मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेच्या ५० टक्केही जलसाठा उपलब्ध झाला नाही. मात्र लघु प्रकल्पापैकी २९ प्रकल्पात जलसाठा उपलब्ध झाला आहे. परंतु अद्यापही ८ लघु प्रकल्प तहानलेलेच आहेत. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.


  मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठा
  काटेपूर्णा : ३०.७० दलघमी
  वान : ४६.९५ दलघमी
  मोर्णा : ८.९३ दलघमी
  निर्गुणा : ११.२२ दलघमी
  उमा : ३.५७ दलघमी


  १०० टक्के भरलेले हे लघु प्रकल्प
  ३६ लघु प्रकल्पांपैकी सुकळी, पिंपळगाव चांभारे, पिंपळगाव हांडे, सावरखेड, इसापूर, जनुना, मोझरी, घोंगा, झोडगा, मोऱ्हळ, हातोला हे ११ लघु प्रकल्प १०० टक्के भरले असून ओव्हरफ्लो झाले आहेत.


  ८ लघु प्रकल्प तहानलेलेच
  ११ लघु प्रकल्प १०० टक्के भरले असताना भिलखेड, धारूर, शहारपूर बृहत, पोपटखेड, पोपटखेड टप्पा-२, शहापूर, दगडपारवा, कसुरा, तामसी हे ८ लघु प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.

Trending