आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल निरीक्षण गृहात दोन बालकांवर अत्याचार; चौकशी समिती स्थापन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - घरची वाट चुकलेली मुलांना बालगृहात तर ज्याच्या हातून गुन्हा घडलेला आहे अशा बालकांना बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात येते. दोन्ही गृहातील बालकांना पोलिसांपासून चार हात लांब ठेवणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. येथे रवानगी केलेल्या बालकांत सुधारणा घडवण्यात येते. मात्र याच बाल निरीक्षण गृहात खुनाच्या आरोपातील मुलांनी दोन बालकांवर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने बालकांची सुरक्षितता धोक्यात आली. बाल कल्याण समितीच्या तक्रारीवरून शनिवारी खदान ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर बाल कल्याण समितीने या गंभीर प्रकरणाची दखल घेत पाच सदस्यांची चौकशी समिती नेमली.

 

विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलांना ठेवण्यासाठी गोरक्षण रोडवर बाल निरीक्षण गृह आहे. या बाल निरीक्षण गृहात गुन्ह्यातील आरोपी तसेच मातापित्यांपासून दुरावलेल्या बालकांच्या पालकांचा शोध घेईपर्यंत ठेवण्यात येते. त्यासाठी त्यांची स्वतंत्र व्यवस्था कायद्यानुसारच करावी लागते. बालगृहात गुजरातहून आलेल्या १३ वर्षाच्या बालकाला व मुंबईहून आणलेल्या अकोल्यातीलच १४ वर्षाच्या बालकाला दाखल केले होते. निरीक्षण गृहात खुनाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी, दुसरा चोरीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी होता. त्यांनी १३ व १५ वर्षाच्या मुलाला मारहाण करून त्यांच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. मुलांवर अत्याचार झाल्याचे बालकल्याण समितीचे अध्यक्ष संजय सेंगर यांच्या लक्षात आल्यानंतर याला वाचा फुटली. त्यांनी मुलांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर खदान ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

 

वेगवेगळे न ठेवता मुले एकाच खोलीत कशी?
विधी संघर्ष ग्रस्त बालकांना वेगळ्या खोलीत ठेवावे लागते तर काळजी संरक्षक बालकांना वेगळ्या खोलीत ठेवावे लागते. मात्र अत्याचार झाला तेव्हा ही मुले एकाच खोलीत कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या विषयी चौकशी करण्यासाठी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष संजय सेंगर यांनी पाच सदस्यांची समिती प्रा. किशोर वहाणे यांच्या नेतृत्वात नेमली.

 

घटना गंभीर आहे, चौकशी होईल
झालेली घटना दुर्देवी आहे. असा प्रकार घडायला नको. जर मुले एकाच खोलीत असतील तर गंभीर बाब आहे. कारवाई केली असून, चौकशी समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानंतर कारवाई निश्चित करण्यात येईल.
- संजय सेंगर, अध्यक्ष बाल कल्याण समिती

 

बातम्या आणखी आहेत...