आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६ पैकी तब्बल २२ मतदान केंद्र संवेदनशील; प्रशासनाचा आढावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायतीत २६ पैकी २२ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. येत्या १५ जुलै रोजी या ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठीची पहिली सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदानाच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. 


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या शहराचा आढावा घेतला. गावाचा जुना इतिहास लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने तेथील २२ मतदान केंद्रे संवेदनशील अाहे, असा अहवाल दिला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी शहरात सुरक्षेची विशेष उपाययोजना केली जाणार आहे. ९ हजार ३३३ महिलांसह या ठिकाणी एकूण १८ हजार ८८७ मतदार आहेत. या सर्वांना विविध २६ केंद्रांवरुन मतदान करावे लागेल. प्रशासनाने तयार केलेल्या अहवालानुसार वॉर्ड क्रं. एकसाठीचे सावित्रीबाई फुले विद्यालय, वॉर्ड क्रं. दोन व तीन साठीचे पंचायत समितीचे बचतभवन, वॉर्ड क्रं. ११ साठीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह ही चार मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्या भागात राहणारी मंडळी, त्या भागाची भौगोलिक रचना, मतदानादरम्यान यापूर्वी घडलेल्या घटनांचा परामर्श घेता ही मांडणी केली आहे. त्यामुळे १५ जुलैच्या मतदानादरम्यान या चारही केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. 


जिल्हा प्रशासन दक्ष 
संवेदनशील मतदान केंद्रांबाबत जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता बाळगली आहे. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त आणि मतदारांची ओळख पटविण्यासाठीची विशेष खबरदारी या केंद्रांवर घेतली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठीच्या स्वतंत्र सूचना दिल्या आहेत. 


अपर जिल्हाधिकारी वानखडे निरीक्षक 
या निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी वाशीमचे अप्पर जिल्हाधिकारी िदनेशचंद्र वानखडे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तेथे तळ ठोकला होता. आता ते पुन्हा मतदान व मतमोजणीला येतील. 

बातम्या आणखी आहेत...