आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसपींसह 24 अधिकारी, 129 पोलिस रात्र गस्तीवर!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - गुन्हेगारांवर वचक राहावा, त्यांची तपासणी व्हावी, म्हणून ऑपरेशन ऑल आऊट जिल्हा पोलिस राबवत असतात. हा उपक्रम पोलिसांनी शनिवारी रात्री राबवला. रात्र गस्तीवर पोलिस अधीक्षकांसह २४ अधिकारी व १२९ पोलिस कर्मचारी उतरले होते. त्यात त्यांनी निगराणी बदमाश, तडीपार आरोपीच्या घरी अचानक छापे टाकले.


रात्री ११ वाजतापासून २ वाजेपर्यंत पोलिसांनी ऑपरेशन ऑल ऑऊट राबवले. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणेदार रात्र गस्तीवर होते. या वेळी २४ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. ८ जमानती वॉरंट, ५ पकड वॉरंट व २८ जणांना समन्स बजावले. ४६ संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असून १० फरार आरोपींना अटक केले व ४६ निगराणी बदमाशांची चौकशी केली.

 

बातम्या आणखी आहेत...