आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'काटेपूर्णा'त 25 दशलक्ष घनमीटर जलसाठा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरासह विविध गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात २५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. या साठ्यातून अकोला पाणी पुरवठा योजनेसह विविध पाणी पुरवठा योजनांना वर्षभर पाणी पुरवठा करता येणार आहे. मात्र सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठी वाढ होणे गरजेचे आहे.

 

अकोला जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला तरी काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत नाही. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव,मेडशी परिसरात जोरदार पाऊस झाला की काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होते.


गेल्या तीन ते चार दिवसापासून वाशीम जिल्ह्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. अकोला शहराला वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी किमान २० दलघमी पाण्याची गरज भासते. अकोला शहरासोबतच ६४ खेडी पाणी पुरवठा, मूर्तिजापूर शहर पाणी पुरवठा आदी विविध पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा करण्यासाठी ४ ते ५ दलघमी पाण्याची गरज भासते. ही गरज उपलब्ध जल साठ्यातून पूर्ण होणार आहे. मात्र काटेपूर्णा प्रकल्पाची मुळ आस्थापना ही सिंचन आहे.काटेपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून ८ हजारापेक्षा जास्त हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. मागील वर्षी प्रकल्पात कमी जलसाठा असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देता आले नाही. त्यामुळेच या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...