आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील २५३ पोलिसांच्या झाल्या बदल्या; अधीक्षकांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून पडताळणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- जिल्ह्यातील २५३ पोलिसांच्या बदलीची प्रक्रिया पाडली. पहिली यादी रविवारी जारी केली असून, अनेक कर्मचाऱ्यांची ग्रामीण भागात बदली केली अाहे. प्रशासकीय वरून १४१ व विनंतीवरून ११२ पोलिसांच्या बदल्या केल्या. 


पाेलिसांच्या बदल्या हा चर्चेचा विषय राहिला अाहे. अनेक कर्मचारी ग्रामीण भागात जाण्यास इच्छुक नसतात. काहींचे कौटुंबिक कारण असते, तर काहींना इतर कारणास्तव शहरातच पाेस्टींग हवे असते. दरम्यान काही दिवसांपासून बदली प्रक्रिया प्रारंभ झाला. जिल्ह्यातील २२ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा विहित कालावधीत संपुष्टात अाल्याचे बदली प्रक्रिया राबवली. प्रशासकीय व विनंतीवरून बदली पात्र कर्मचाऱ्यांनी पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीसमोर हजेरी लावली. त्यानंतर बदलीची यादी जाहीर करण्यात अाली. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचा अादेश संबंधित ठाणेदारांना देण्यात अाला अाहे. 


'एलसीबी'मध्येही बदल्या

बदली प्रक्रियेत काहींची स्थानिक गुन्हे शाखेतही बदली करण्यात अाली अाहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरील ताण कमी हाेण्याची शक्यता अाहे. जिल्हयातील गुन्हे उघडकीस अाणण्याची जबाबदारी असलेल्या एलसीबीमध्ये पुरेसे मनुष्य बळ असणे अावश्यक असते. तसेच येणारे िदवस हे धार्मिक उत्सवांचे राहणार असल्याने आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक असल्याने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहणे अावश्यक अाहे. यासाठी अाता एलसीबीमध्ये बदली झाल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांचा दिलासा मिळाला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...