आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत करामुळे तीन मोबाईल टॉवरला 'सिल', शहरातील 3 चौरस कि.मी. एरीया झाला 'म्युट'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महानगरपालिका मालमत्ता जप्ती पथकाच्या वतीने शहरातील विविध भागातील जी.टी.एल. इन्फ्रास्टंक्चर लिमिटेड कंपनीच्या तीन मोबाईल टावरांवर थकीत करापोटी सील लावण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील तीन चौरस किलोमीटर एरीया म्युट झाला.

 

पुर्वझोन मधील रामनगर, गजानन महाराज मंदिराजवळ, मालमत्ता क्रंमांक २१६६ यांचेकडे १२०१५ ते २०१८ पर्यंत एक लाख ७४ हजार ६७७ तसेच दक्षिण झोन मधील आदर्श काॅलनीतील, मालमत्ता क्रंमांक ५९४ यांच्याकडे २०११ ते २०१८ पर्यंत तीन लाख ३० हजार १३७ रुपये तर पश्चिम झोन मधील हरिहर पेठ भागातील मालमत्ता क्रमांक ८७७ यांच्याकडे २०११ ते २०१८ पर्यंत पाच लाख ७५ हजार १८१ रुपयाचा मालमत्ता कर थकीत होता. थकीत कराबाबत वारंवार सुचना तसेच नोटीस देवूनही थकीत कराचा भरणा न केल्याने आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या आदेशान्वये आणि अतिरिक्त आयुक्त दीपक पाटील आणि कर अधिक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात मोबाईल टॉवर सिल करण्यात आले. त्यामुळे शहराच्या विविध भागात एकुण तीन चौरस किलोमिटर एरीया म्युट झाला. नागरिकांनी थकीत आणि चालु मालमत्ता कराचा भरणा करुन सील व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

 

ही कारवाई जप्ती पथक प्रमुख सय्यद मुमताज अली, महादेव लोखंडे, सुधीर मालटे, सहा.कर अधिक्षक प्रशांत बोळे, नंदकिशोर उजवणे, गजानन घोंगे , प्रकाश कपले, मोहन घाटोळ, प्रकाश मालगे, अशोक जाधव, सुरक्षा रक्षक शोभा पांडे आदींनी केली. दरम्यान, महापालिकेच्या वाढीव मालमत्ता कराचा मुद्दा सध्या गाजत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...