आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पातूर तालुक्यात चाैघांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर - तालुक्यातील तीन वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याने शुक्रवार २ फेब्रुवारी हा अपघात वार ठरला. चान्नी फाट्याजवळ दोघांचा, शिर्ल्याजवळ एकाचा तर विवरा फाट्याजवळ आणखी एकाचा अपघातात मृत्यू झाला. दोन अपघातातील मृतक पातूरचे तर तिसऱ्या अपघातातील मृतक मळसूर येथील रहिवासी होते. चौथ्या अपघातात एक जण जखमी आहे.

 

वाडेगाव येथून पातूरकडे जात असलेली भरधाव दुचाकी चान्नी फाट्याजवळ घसरल्याने अपघातात दोघेही दुचाकीस्वार ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजताच्या दरम्यान घडली. देविदास सुरवाडे व सुनील गवई अशी मृतकांची नावे असून, दोघेही पातूर येथील रहिवासी आहेत. यापैकी एकाचा मृत्यू घटनास्थळावरच, तर दुसऱ्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तालुक्यातील दिग्रस बु. येथे सोपीनाथ महाराज यात्रेनिमित्ताने परिसरात व रस्त्यावर मोठी गर्दी होती. शुक्रवारी सकाळी पातूर येथील वाळूचे व्यवसायी देविदास सुरवाडे (४८) व ट्रॅक्टर चालक सुनील गवई (४५) हे त्यांच्या सीजी ०७ - ७७२२ क्रं.च्या बुलेटद्वारे वाडेगाव येथून पातूरकडे जात होते. चान्नी फाट्याजवळ त्यांची दुचाकी घसरली. त्यातदेविदास सुरवाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर सुनील गवई यांना उपचारासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात नेताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला.


वाडेगाव पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. मृतक हे दोघेही पातूर शहरातील भीमनगरातील रहिवासी होते. मृतक हे काम आटोपून पातूरला येत होते. सुनील गवई यांच्यावर घराची जबाबदारी होती. त्यांना दोन अपत्य असून, त्यांच्या अचानक मृत्यूमुळे लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आता त्यांच्या पत्नीवर अाली आहे.

बातम्या आणखी आहेत...