आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाबीजचे 5 लाख 97 हजार क्विंटल बियाण्यांचे नियोजन; खरिपासाठी सोयाबीन बियाण्यांमध्ये वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यंदाच्या खरीप हंगामासाठी ५ लाख ९७ हजार ७७४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले आहे. सोयाबीन बियाण्यांचे विक्रीचे उद्दिष्ट सर्वाधिक म्हणजे साडेचार लाख क्विंटलचे असून चार लाख तीस हजार बियाणे बाजारामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक आेमप्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात नियोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 


गेल्या वर्षी कापसावर आलेल्या सेंद्रिय बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने महाबीजने नियोजन केले आहे. अतिरिक्त बियाणे उपलब्ध करण्यासाठी ई-निविदा काढण्यात आली आहे. 


महाबीजकडे तुरीचे १६५४५ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. खुल्या बाजारामध्ये यंदा शेतकऱ्यांना तूर वाणाचे भाव कमी मिळत असल्याने खरिपाच्या क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता आहे. दहा वर्षातील तूर बियाण्यांची उपलब्धता समाधानकारक असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानावर शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वाटप करण्यात येईल. ७०३१ क्विंटल मूग बियाणे, १८२०५ क्विंटल उडीद, भात बियाणे सुधारित ५६३२२ क्विंटल तर संकरित भात ५७५ क्विंटल बियाणे. महामंडळामार्फत संशोधित अती बारीक वाण महाबीज-११०,महाबीज-१२५ या वाणाचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राज्यात फक्त नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, पूणे, सातारा या ८ जिल्ह्यांसाठी आहे. १० वर्षाआतील वाण ६११० क्विंटल उपलब्ध आहे. व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे. महामंडळामार्फत ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत १० वर्षावरील प्रमाणित धान बियाणे विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाटप करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास शेतकऱ्यांना अनुदानित दराने बियाणे वाटप करता येईल व त्यामुळे बियाणे बदलाचे प्रमाण वाढू शकते, अशी शक्यता महाबीजचे विपणन महाव्यवस्थापक आर. जी. नाके यांनी व्यक्त केली. 


अनुदान प्रस्ताव 
महामंडळामार्फत ग्राम बिजोत्पादनांतर्गत खरीप हंगामात अनुदानावर बियाणे वाटप करण्यासाठी भात व सोयाबीन बियाण्याकरिता ६२८९.९९ लाख रुपये व रब्बी, उन्हाळी हंगामासाठी ५६३२.५२ लाख रुपये असे एकूण ११९२२.५१ लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्र व राज्य शासनास सादर केलेला आहे. 

बातम्या आणखी आहेत...