आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

67 वर्षीय वृद्धाचा 8 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग, नराधमाला पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - 67 वर्षीय वृद्धाने आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. ही घटना उरळ पोलिस ठाण्यांतर्गत अंदुरा येथे घडली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी नराधम वृद्धाला बेड्या ठोकल्या आहेत.  

 

पीडित मुलीची आई मंगळवारी सकाळी 10 वाजता शौचास गेल्याचे पाहून मुलीच्या दारातच गप्पा मारत बसलेल्या निरंजन धोंडूजी उमाळे या नराधमाने मुलीला जवळ घेतले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून त्याने तिचे तोंड दाबले व तिच्यावर अतिप्रसंग केला. काही वेळाने मुलीची आई घरी आली. मुलीने तिला आपबीती सांगितल्यानंतर मायलेकींनी पोलिस ठाणे गाठले. आईच्या तक्रारीवरून ठाणेदार सतीश पाटील यांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्याविरुद्ध भांदवि 376, 354, पोस्को 4,8,12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी पोलिस आरोपीला न्यायालयात हजर करणार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...