आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या आस्थापनेवरील ८०० पदे रिक्त; कामकाजाला विलंब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- १२५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा कारभार पाहणाऱ्या महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे तर रिक्त आहेतच. परंतु महापालिका आस्थापनेवरील ८०० पदे रिक्त असल्याने कोणत्या विभागाची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्यावर सोपवावी? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. या सर्व प्रकारामुळे महापालिकेचे कामकाज कोलमडले आहे. 


महापालिका अस्तित्वात येऊन १९ वर्ष होत आली आहेत. महापालिकेचा आकृतिबंध मंजुर असला तरी बिंदु नामावली अद्याप मंजुर नाही. त्यामुळे पदोन्नती आणि सरळ सेवा भरती गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. परंतु सेवा निवृत्ती दर महिन्याला सुरु आहे. त्यामुळे दर महिन्यात महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचारी कमी होत आहे. त्यामुळे महापालिका अास्थापनेवरील कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त झाली आहेत. त्यामुळे महापालिकेत लिपिक, प्रमुख सहायक, अधीक्षक आदी सर्व मिळून ८०० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी ७५ टक्के पदे ही पदोन्नतीने भरली जाणार आहेत तर उर्वरित पदे सरळ सेवा भरतीने भरली जाणार आहे. बिंदुनामावली मंजुर नसल्याने पदोन्नतीची प्रक्रिया रखडली आहे. तर दुसरीकडे महापालिकेचे क्षेत्रफळ २८ चौरस किलोमीटर वरुन १२४ चौरस किलोमीटर झाले आहे. त्यामुळे क्षेत्रफळ वाढले असताना महत्त्वाची पदे मात्र रिक्त आहेत. या रिक्त पदाचा प्रभार महापालिका कर्मचाऱ्यांकडे दिला जात आहे. त्याच बरोबर राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत, त्या पदांची जबाबदारीही महापालिका अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येत असल्याने एकाच वेळी तीन ते चार जागांचा प्रभार अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाहावा लागत असल्याने कामकाज संथगतीने तर सुरुच आहे. परंतु कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मानसिक ताणही वाढला आहे. याचा परिणाम कामकाजावर होतो. 


बिंदूनामावलीचे काम जवळपास पूर्ण 
महापालिकेतील पदोन्नतीची प्रकरणे बिंदू नामावली पूर्ण न झाल्याने तसेच बिंदू नामावलीस मंजुरी न मिळाल्याने रखडली आहेत. मात्र आता प्रशासनाने बिंदू नामावलीचे काम जवळपास पूर्ण केले असून, मंजुरीसाठी अमरावती येथे पाठवली आहे. त्यामुळे बिंदू नामावली मंजूर होई पर्यंत पदोन्नतीची प्रकरणे निकाली लागणार नाहीत आणि रिक्त जागा भरल्या जाणार नाहीत. 


शिपाई करतात लिपिकाचे काम 
पदे रिक्त असल्याने आणि पदोन्नती प्रकरणे रखडल्याने शिपाई म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लिपिकासह विविध जबाबदारीच्या पदांवर काम करावे लागत आहे. 


क्षेत्रफळ वाढले कर्मचारी कमी झाले 
महापालिकेची हद्दवाढ होण्यापूर्वी २८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ होते. आता १२५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ झाले. त्यामुळे समस्यांसह कामाचा व्याप वाढला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ होणे अपेक्षित होते. मात्र दुर्देवाने हद्दवाढ झाल्याने क्षेत्रफळ वाढले मात्र कर्मचारी कमी झाले, अशी विचित्र परिस्थिती महापालिकेत निर्माण झाली आहे. 


क्षेत्रफळ वाढले कर्मचारी कमी झाले 
महापालिकेची हद्दवाढ होण्यापूर्वी २८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ होते. आता १२५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ झाले. त्यामुळे समस्यांसह कामाचा व्याप वाढला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ होणे अपेक्षित होते. मात्र दुर्देवाने हद्दवाढ झाल्याने क्षेत्रफळ वाढले मात्र कर्मचारी कमी झाले, अशी विचित्र परिस्थिती महापालिकेत निर्माण झाली आहे. 


मनपातील अंतर्गत रिक्त पदे 
प्रमुख सहाय्यक : १० 
अधीक्षक : ०४ 
उपमुख्य लेखापाल : ०१ 
कनिष्ठ अभियंते : ३४ 
लिपिक : ९५ 
लेखापाल : ०१ 
उपलेखापाल : ०१ 
नगर सचिव : ०१ 
कनिष्ठ विधी अधिकारी : ०१ 
शहर अभियंता : ०१ 
महिला बाल विकास अधिकारी : ०१ 
समाज विकास अधिकारी : ०१ 
आरोग्य निरीक्षक : ०७ 

बातम्या आणखी आहेत...