आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्‍यात 91 शेतकऱ्यांनी मागितले इच्छा मरण, राष्ट्रपतींना निवेदन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - नवीन भूसंपादन कायद्यानुसार शेत जमिनीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी उपोषण सुरु असताना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या ९१ शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे आज २१ मार्च रोजी पाठवण्यात आले आहे.

 

मलकापूर ते अकोला या मार्गाच्या दरम्यान रस्ता सहा पदरी करण्याचे काम करण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन सरकारने रस्ता सहा पदरी करण्याकरता संपादित केली आहे. या कामात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी गेल्या आहेत. या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला हा १९५६ नुसार देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्यान्वये मोबदला मिळावा यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून चिखली आमसरी, माक्ता शिवार व टेंभुर्णा शिवारात साखळी उपोषण सुरु आहे. सरकार व लोकप्रतिनिधी देखील न्याय देण्यास अपयशी ठरल्याने अखेर हताश झालेल्या चिखली बु., चिखली खुर्द., वाडी, माक्ता, कोक्ता, जयपूर लांडे, सुटाळा, टेंभुर्णा सह आदी गावातील ९१ शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी निवेदनाद्वारे मागितली आहे.

बातम्या आणखी आहेत...