आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेल्यातील 990 गावांत दुष्काळ जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पैसेवारीचा निकष अाणि पावसातील खंड याआधारे शासनाने अकोला जिल्ह्यात दुष्काळ घोषित केला आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांची पैसेवारी ५० च्या आंत असल्यामुळे सर्वच्या सर्व ९९० गावांवर दुष्काळाची गडद छाया पसरली असून त्यासाठीच्या उपाययोजना लागू करण्याचे निर्देशही सदर घोषणेत समाविष्ट करण्यात आले आहे.


राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांच्या ६ हजार ५२४ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती उद्भवली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ९९० गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना लागू करुन तेथील नागरिकांसह पाणी आणि वैरणाची व्यवस्था करुन सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांनाही संरक्षण दिले जाणार आहे. 


राज्य शासनाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार शेतकरी-शेतमजुरांसाठी विविध आठ प्रकारच्या सवलती घोषित करावयाच्या असून त्या सवलतींपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा आणि त्यासाठी आवश्यक


निधी उपलब्ध करुन द्यावा, असे स्पष्ट करण्यात
आले आहे. दुष्काळ घोषित झाल्यामुळे सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित
कर्जवसुलीस स्थगिती या दोन प्रमुख मुद्द्यांवर अंमल केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...